सौदीची रय्याना बरनावी ठरली विक्रमवीर
#रियाध
सौदी अरब येथील रय्याना बरनावी देशातली पहिली महिला अंतराळवीर ठरली आहे. रय्याना बरनावी आपल्या तीन सहकाऱ्यांसह एक्स-२ मिशनमध्ये सहभागी झाली आहे. सौदीतील अनेक महिला आणि तरुणींसाठी रय्याना आदर्श ठरत आहे. ज्या सौदी अरबमध्ये महिलांसाठी कठोर कायदे आहेत, त्याच देशातील एक महिला आता अंतराळाचा प्रवास करणार आहे. रय्याना बरनावीने ओटागो विद्यापीठातून बायोमेडिकलमध्ये पदवी घेतली आहे. तिने सौदी अरबमधून बायोमेडिकल सायन्समध्ये मास्टर्सपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. स्तनाचा कर्करोग आणि स्टेम सेल कॅन्सर विषयात तिने नऊ वर्षे काम केले आहे. ती आता आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या १० दिवसांच्या मिशनवर जात आहे.
वृत्तसंस्था