फाशीची शिक्षा सुनावलेल्या आठ माजी नौसैनिकांची सुटका

भारताची कूटनीती यशस्वी ठरली असून कतारने फाशी ठोठावलेल्या आठ माजी नौसैनिकांची सुटका करण्यास सहमती दर्शवली आहे.

Releaseofeightex-marinessentencedtodeath

फाशीची शिक्षा सुनावलेल्या आठ माजी नौसैनिकांची सुटका

#दोहा

भारताची कूटनीती यशस्वी ठरली असून कतारने फाशी ठोठावलेल्या आठ माजी नौसैनिकांची सुटका करण्यास सहमती दर्शवली आहे. त्यांची सुटका झाली असून ते मायदेशीही परतले आहेत. भारताच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे. या सगळ्यांवर हेरगिरीचा आरोप होता. 

कतारने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्या सुटकेचे भारताने त्यांना आवाहन केले होते. त्यांच्याविषयीच्या कागदपत्रांची पूर्तताही केली. त्यानंतर या सगळ्यांच्या फाशी शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर झाले. मात्र आता आठही माजी नौसैनिकांची सुटका करण्यात आली आहे. यापैकी सात जण मायदेशी परतले आहेत.कतारमध्ये ज्या आठ भारतीय माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती त्यांची कतारने सुटका करण्याच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. आठपैकी सातजण भारतात परतले आहेत. या नागरिकांची घरवापसी झाली याचा आम्हाला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

‘भारतमाता की जय’

भारतात जेव्हा माजी नौसैनिक परतले तेव्हा दिल्ली विमानतळावर त्यांनी भारतमाता की जय या घोषणा दिल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतार यांचेही सगळ्यांनी आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणात हस्तक्षेप केला नसता तर आमची सुटका कठीण होती असेही या सगळ्यांनी म्हटलं आहे.

कतारमध्ये एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना एका कनिष्ठ न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. २०२३ मध्ये म्हणजेच गेल्या वर्षी प्रकाशात आलेलं हे प्रकरण आहे. कतारमधील यंत्रणेने त्यांना ३० ऑगस्ट २०२२ रोजी अटक केली होती. कतारने जो मृत्युदंडाचा निर्णय सुनावला होता त्याविषयी, २६ ऑक्टोबर २०२३ रोजी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने  एक निवेदन जारी करून या निकालाबाबत चिंता व्यक्त केली.  निवेदनात म्हटले होते की, भारताच्या आठ माजी नौसैनिकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्याचा निर्णय अनपेक्षित असून, आम्ही तपशीलवार निकालाच्या प्रतीक्षेत आहोत. आम्ही सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करून, त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करू.  त्यानंतर आता या नौसैनिकांची सुटका झाली आहे.वृत्तसंंस्था

भारताच्या मुत्सद्देगिरीला मोठे यश, कतारने दिली सुटकेला मान्यता, नौसैनिक मायदेशी

आठ माजी नौसैनिक कोण?

कतारने ज्या माजी सैनिकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती, त्यामध्ये नौदलाच्या मोठ्या निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुणाकर पाकला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि नाविक रागेश यांचा समावेश होता. कतारमधील अल दाहरा ग्लोबल टेक्नोलॉजीस अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीत ते कार्यरत होते. या कंपनीमार्फत संरक्षणविषयक सेवा दिली जाते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest