पुतिन विरोधक नवाल्नी यांची हत्या नोविचोकद्वारे?

नोविचोक रासायनिक अस्त्र असून त्यातून वाचणे केवळ अशक्य

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Shital Jagtap
  • Thu, 22 Feb 2024
  • 01:22 pm
Novichok

पुतिन विरोधक नवाल्नी यांची हत्या नोविचोकद्वारे?

#मॉस्को

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर राजकीय विरोधक अलेक्सी नवाल्नी यांचा गूढ पद्धतीने मृत्यू झाला आहे. त्यामुळे रशियात अस्वस्थता आणि अंशाततेचे वातावरण आहे. नवाल्नी यांच्या हत्येमागे पुतिन यांचा हात असल्याचा संशय जगभर व्यक्त केला जात आहे. पुतिन यांनी आपले विरोधक नवाल्नी यांना मारण्यासाठी नोविचोक या विषाचा वापर केल्याचा दावा केला जात आहे.

नोविचोक हे एक रासायनिक अस्त्र आहे. अशा अस्त्रावर उपचार नसल्यात जमा आहे. नोविचोकचा रशियन भाषेतील अर्थ नव्याने आलेला किंवा अनोळखी असा आहे. या विषाचे निदान करणे कठीण असल्याचे मानले जाते. त्यामुळे जेव्हा एखाद्यावर या विषाचा प्रयोग केला जातो, तेव्हा त्याचे वाचणे जवळपास अशक्य असते.

नोविचोक नर्व एजंट हा १९७० ते १९८० या काळात विकसित करण्यात आला होता. याला फोलिएंट म्हणून विकसित करण्यात आले. नोविचोकचा वापर युद्धादरम्यान केल्याचा आतापर्यंत पुरावा नाही. मार्च २०१८ मध्ये ब्रिटनच्या सैलिसबरी शहकात स्किरपाल आणि त्यांच्या मुलीवर या विषाचा प्रयोग केला होता. सुदैवाने दोघे यातून वाचले. त्यानंतर ब्रिटिश सरकारने रशियावर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. अमेरिकेकडे असलेले नर्व एजेंट व्हीएक्स पेक्षा रशियाकडील नोविचोक १० पटीने अधिक प्रभावी आहे. यावरुन याची तीव्रता लक्षात येईल. २०१७ मध्ये उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनी आपल्या सावत्र भावाला मारण्यासाठी अमेरिकेच्या व्हीएक्स विषाचा वापर केला होता. नोविचोक विषाची बाधा झाल्यास त्याचा परिणाम व्यक्तीच्या मांसपेशीवर होतो. एखाद्या झुरळावर जसा विषाचा परिणाम होतो, तसाच त्याचा व्यक्तीवर परिणाम होतो. विष दिलेल्या व्यक्तीला अंग प्रचंड दुखणे, हृदय विकाराचा झटका, श्वास घेण्यास त्रास अशा अडचणी जाणवतात. विष जास्त दिले असल्यास दोन मिनिटात मृत्यू होतो. विषाचे प्रमाण कमी दिले असल्यास मृत्यूला वेळ लागतो. मात्र, प्राण जाताना वेदना नक्की होतात.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest