प्रेमा तुझी उंची किती?

उंच, चुणचुणीत आणि हुशार मुलांना भरपूर मैत्रिणी असतात, असा आपला एक समज आहे. याच समजातून एका ५ फूट ५ इंच युवकाने महागडी शस्त्रक्रिया करून आपली ५ इंच उंची वाढवून घेतली आहे, त्यासाठी आर्थिक कुवत नसताना दीड कोटी रुपयांचा खर्च केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 17 Apr 2023
  • 03:41 pm
प्रेमा तुझी उंची किती?

प्रेमा तुझी उंची किती?

#वाॅशिंग्टन

उंच, चुणचुणीत आणि हुशार मुलांना भरपूर मैत्रिणी असतात, असा आपला एक समज आहे. याच समजातून एका ५ फूट ५ इंच युवकाने महागडी शस्त्रक्रिया करून आपली ५ इंच उंची वाढवून घेतली आहे, त्यासाठी आर्थिक कुवत नसताना दीड कोटी रुपयांचा खर्च केला आहे.

गर्लफ्रेंड मिळवण्यासाठी उंची वाढावी म्हणून शरीरावर महागडी शस्त्रक्रिया करणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे मोझेस गिब्सन. तरुणींना आवडलो पाहिजे, या विचाराने त्याने हा प्रकार केला असल्याचेही स्पष्ट केले आहे.

अमेरिकेतील मिनीसोटा येथील मोझेस गिब्सनने फक्त ५ इंच उंचीसाठी मोठा वेदनादायी संघर्ष केला आहे. यासाठी आधी उंची वाढावी म्हणून अनेक औषधे वापरून बघितली आहेत. आध्यात्मिक बाबा-बुवांचा सल्लाही घेतला आहे. उंची वाढवण्यासाठी आपल्याकडे ज्या विचित्र उपाययोजना केल्या जातात तशाच काहीशा उपाययोजना मोझेस गिब्सनने केल्या आहेत.

मोझेस गिब्सन हा व्यवसायाने इंजिनिअर असून त्याने पैसे उभे करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत केली आहे. त्याने दिवसपाळीत इंजिनिअरची आणि रात्रपाळीत टॅक्सी ड्रायव्हरची नोकरी करून शस्त्रक्रियेसाठी पैसे साठवले होते. त्याने सहा-सात वर्षांपूर्वी पहिली शस्त्रक्रिया करून घेतली. यासाठी त्याने लाखो रुपये खर्च केले आणि ३ इंच इतकी उंची वाढवली. तसेच दुसरी शस्त्रक्रिया मार्च महिन्यात पार पडली असून यासाठी त्याने पुन्हा लाखो रुपये खर्च केले. वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest