अवघ्या १३ वर्षांच्या मुलीने आईला केले कंगाल !

ऑनलाइन गेमिंगच्या नादात एका अल्पवयीन मुलीने आईच्या अकाऊंटमधून लाखो रुपये उडवले. एका खास ट्रिकने तिने आईचे बँक अकाऊंट लिंक करून ठेवले होते. अवघ्या १३ वर्षांच्या मुलीने आईला कंगाल करताना ऑनलाइन गेममध्ये तब्बल ५३ लाख रुपये उडवले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 3 Jun 2023
  • 01:05 am
अवघ्या १३ वर्षांच्या मुलीने आईला केले कंगाल !

अवघ्या १३ वर्षांच्या मुलीने आईला केले कंगाल !

ऑनलाइन गेम खेळता खेळता ५२ लाख उडवले

#बीजिंग

ऑनलाइन गेमिंगच्या नादात एका अल्पवयीन मुलीने आईच्या अकाऊंटमधून लाखो रुपये उडवले. एका खास ट्रिकने तिने आईचे बँक अकाऊंट लिंक करून ठेवले होते. अवघ्या १३ वर्षांच्या मुलीने आईला कंगाल करताना ऑनलाइन गेममध्ये तब्बल ५३ लाख रुपये उडवले.

ऑनलाइनच्या आभासी जगात मुलांवर नियंत्रण ठेवले नाही तर तुमच्यावर पश्चात्तापाची वेळ येईल. अशीच परिस्थिती चीनमधील एका महिलेवर आली. एका अल्पवयीन मुलीने ऑनलाइर्न गेमवर ५३ लाख रुपये लावले होते. मुलीने नामी शक्कल लढवत आईचे बँक अकाऊंट रिकामे केले. लाखो रुपये असलेल्या खात्यात अवघे नाममात्र पैसे शिल्लक असलेले पाहून त्या मुलीच्या आईला प्रचंड धक्का बसला. ही गोष्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, मध्य चीनच्या हेनान प्रांतातील ही १३ वर्षीय मुलगी सतत फोनवर गेम खेळायची. आईने तिला अनेक वेळा रोखण्याचा प्रयत्न केला, पण तिने  ऐकलं नाही. तिला स्मार्टफोनवर पे-टू-प्ले गेम्स खेळण्याचं व्यसन लागलं होतं. त्यातच तिला पैशांची गरज होती. मुलीने फोन आईच्या बँक अकाऊंटशी लिंक केलेला होता. मुलीने त्याचाच फायदा घेत गेमिंग ॲपही खात्याशी लिंक केले. परिणामत: मुलीच्या आईच्या खात्यातून पैसे कापले जाऊ लागले. आईला त्याची काहीच कल्पना नव्हती. एके दिवशी शाळेत त्या मुलीच्या शिक्षकाने हे उद्योग पाहिले आणि त्यांनी तत्काळ तिच्या आईला या गोष्टीची कल्पना दिली.

हा प्रकार कळल्यावर आईने तिचा बँक बॅलन्स तपासला असता डोक्यालाच हात लावायची वेळ आली. तिच्या खात्यात पूर्वी ४,४९,५०० युआन म्हणजेच सुमारे ५२.७१ लाख रुपये होते, त्यात आता फक्त ५ रुपये शिल्लक आहेत. चीनच्या सोशल मीडियावर याबाबतचा व्हीडीओ व्हायरल होत आहे. 

१४ लाख रुपये देऊन ऑनलाइन गेम खरेदी केल्याचे त्या मुलीने सांगितले. फक्त स्वत:च नाही तर तिने त्याच पैशातून तिच्या १० मित्रांसाठी गेमही विकत घेतला जेणेकरून ते एकत्र खेळू शकतील. यासाठी सुमारे १२ लाखांचा खर्च झाला. ‘‘आधी मी माझ्या मित्रांना नकार दिला पण त्यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यावर मी त्यांच्यासाठी गेम विकत घेतले,’’ असे त्या मुलीने अतिशय निरागसपणे सांगितले.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest