जर्मनीत सापडली अष्टकोनी तलवार

जर्मन पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मोठा खजिना सापडला आहे. एका कबरमध्ये कांस्य युगामधील पूर्णतः सुरक्षित तलवार त्यांना सापडली आहे. ही तलवार ३००० वर्षांपेक्षाही जुनी आहे, पण तरीही या तलवारीवर एक साधा ओरखडाही नाही. या शास्त्रज्ञांच्या मते, ही तलवार नव्या तलवारीसारखी लखलखत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 21 Jun 2023
  • 12:34 am
जर्मनीत सापडली अष्टकोनी तलवार

जर्मनीत सापडली अष्टकोनी तलवार

पुरातत्त्वशास्त्रज्ञांना सापडली ३ हजार वर्षांपूर्वीची तलवार

#नॉर्डलिंजेन

जर्मन पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मोठा खजिना सापडला आहे. एका कबरमध्ये कांस्य युगामधील पूर्णतः सुरक्षित तलवार त्यांना सापडली आहे. ही तलवार ३००० वर्षांपेक्षाही जुनी आहे, पण तरीही या तलवारीवर एक साधा ओरखडाही नाही. या शास्त्रज्ञांच्या मते, ही तलवार नव्या तलवारीसारखी लखलखत आहे.

ऐतिहासिक वस्तू, कागदपत्र आणि संसाधनाचे संवर्धन करणाऱ्या बवारियातील मुख्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही तलवार इसवी सन पूर्व १४ म्हणजे कांस्य युगाच्या मध्यातली आहे. दक्षिण जर्मनीमध्ये गेल्या आठवड्यात ही तलवार एका कबरमध्ये सापडली असून तीन लोकांची हाडेही सापडली आहेत. संशोधकांचा अंदाज आहे की, ही हाडे एक पुरुष, एक स्त्री आणि एका लहान मुलाची आहेत, पण या तिघांचा एकमेकांशी काय संबंध आहे, याबद्दल काहीही माहिती समोर आलेली नाही.

ऐतिहासिक वस्तू, कागदपत्र आणि संसाधनाचे संवर्धन करणाऱ्या बवारियातील मुख्यालयाचे प्रमुख मॅथियस फायल यांनी सांगितले की, तलवार आणि कबरचा तपास करावा लागेल. त्यानंतरच पुरातत्त्वशास्त्रज्ञ याबद्दल व्यवस्थित माहिती देऊ शकतील. अशा पद्धतीच्या वस्तू मिळणे दुर्लभ आहे.  काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या तलवारीचा आकार अष्टकोनी आहे. त्यामुळे ही तलवार आणखी दुर्मीळ ठरते. ही तलवार बनवण्यासाठी अत्यंत कुशल कारागिरांची आवश्यकता असते. या प्रकारच्या तलवारींच्या मुठीच्या वर एक पाते लावले जाते, त्याला 'ओवरले कास्टिंग' असे म्हणतात. इनले आणि हॉलमार्कच्या मदतीने याची सजावटही केली जाते. अशा पद्धतीची तलवार त्या काळामध्ये जर्मनीतल्या फक्त दोनच ठिकाणी म्हणजे उत्तर जर्मनी आणि दक्षिण जर्मनीमध्ये बनवली जायची. जर्मनीमध्ये अनेक कबर खोदून त्यातल्या तलवारी लुटण्यात आल्या होत्या. त्यामुळे हा शोध महत्त्वाचा मानला जातो.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest