युध्दविरामासाठी आता चीनला साकडे

रशिया-युक्रेन युद्धात मध्यस्थी करण्यासाठी भारताला गळ घालण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेने आता चीनला मध्यस्थीसाठी तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या चतुराईचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी इमॅन्युएल मॅक्रॉन हे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना भेटणार आहेत. तत्पूर्वी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 27 Feb 2023
  • 01:59 pm
युध्दविरामासाठी आता चीनला साकडे

युध्दविरामासाठी आता चीनला साकडे

#पॅरिस

रशिया-युक्रेन युद्धात मध्यस्थी करण्यासाठी भारताला गळ घालण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेने आता चीनला मध्यस्थीसाठी तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या चतुराईचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी इमॅन्युएल मॅक्रॉन हे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना भेटणार आहेत. तत्पूर्वी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत.

येत्या मार्च महिन्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारत भेटीनंतर त्याच्या पुढच्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात ते चीन दौऱ्यावर जाणार आहेत. इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शनिवारी (२५ फेब्रुवारी) प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन युक्रेनसोबतचा संघर्ष थांबवायला तयार नाहीत. रशियाने हे युद्ध थांबवायला हवे, यासाठी चीनने मध्यस्थी करायला हवी. रशिया-युक्रेन युद्धाबाबत तटस्थ भूमिका घेणाऱ्या चीनने हे युद्ध थांबवण्यासाठी काही तरी प्लॅन आखला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे इमॅन्युएल मॅक्रॉन हे चीनला जाणार आहेत. शी जिनपिंग यांच्याशी होणाऱ्या चर्चेत याबाबत काहीतरी तोडगा निघेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. शी जिनपिंग यांनी पुतीन यांना युद्धविरामासाठी तयार करावे, असा प्रयत्न आपण करणार आहोत. चीनने रशियाबर दबाव टाकला तर हे सहजशक्य आहे, असेही इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितले आहे. दरम्यान चीन रशियाला शस्त्रास्त्रे पुरवत असल्याचे जगजाहीर आहे. त्यामुळे कदाचित शी जिनपिंग यांनी दबाव टाकला तर पुतीन एकल पाऊल मागे घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भारताकडेही खडा टाकून बघणार

दरम्यान रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना,  हे युग युद्धाचे नसल्याचे सांगत खडसावले  होते. त्यामुळे मोदी पुतीन यांच्यावर दबाव टाकतील, अशी अपेक्षा बाळगत अमेरिकेने मध्यस्थीसाठी भारताला आग्रह केला होता. मात्र नरेंद्र मोदी यांनी अद्यापही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. मात्र मोदी अथवा जिनपिंग यांच्यापैकी कोणीतरी पुतीन यांना आवर घालू शकेल, असे अमेरिकेला वाटते. या पार्श्वभूमीवर इमॅन्युएल मॅक्रॉन चीनला जाण्यापूर्वी भारताला भेट देणार आहेत. वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest