अमेरिकेला कॅन्सर उपमा देणाऱ्या मुस्लीम विद्यार्थ्यावर नेटकरी भडकले
वॉशिंग्टन : अमेरिकेला कॅन्सरची म्हणजे कर्करोगाची उपमा देणाऱ्या एका मुस्लीम विद्यार्थ्यावर जगभरातील नेटिझन्स भडकले असून त्यांनी त्याला अमेरिका सोडून जाण्याचा सल्ला दिला आहे. शिकागो विद्यापीठात (University of Chicago) शिकणाऱ्या एका मुस्लीम विद्यार्थ्याने अमेरिकेबाबत ही वादग्रस्त विधाने केली आहेत. अमेरिका हा देश आपल्याला इस्लामिक राष्ट्र करायचा असल्याचा दावाही त्याने केला आहे. या विद्यार्थ्याचं विधान सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतं असून मोहम्मद नुसैरात असं त्याचे नाव आहे.
काय म्हटलं आहे मोहम्मदने?
मोहम्मद नुसैरात म्हणतो की, अमेरिका, येथील सरकार, सेक्युलॅरिझम, लोकशाही, चंगळवाद हे कॅन्सर आहेत. मिडल ईस्टसह सगळ्या जगात हा कॅन्सर पसरला आहे. या ठिकाणची लोकशाही सडून गेली आहे. अमेरिकेत शरिया कायदा आणला पाहिजे. आता आपण सगळे देशात राहायचं आहे. आपल्या देशात परतायचं नाही. अमेरिका हा इस्लामिक किंवा मुस्लीम राष्ट्र झाले पाहिजे. आपल्याला ते लक्ष्य साध्य करायचंच आहे. हा व्हीडीओ ३ मे चा असून जो चांगलाच व्हायरल झाला आहे.
मोहम्मद म्हणतो, मुस्लीम धर्म न्याय आणि सलोखा मानणारा धर्म आहे. मुस्लीम लोक आता अमेरिका नावाच्या कॅन्सरसारख्या देशाला कंटाळले आहेत. येथल्या सरकारचा, लोकशाहीचा त्यांना उबग आला आहे. आयुष्य जगण्यासाठी त्यांना नव्या जीवनशैलीची गरज आहे. मुस्लीम समुदाय हा न्याय आणि सलोखा जपणारा धर्म आहे. मुस्लीम दयाळू असतात. न्याय आणि समता मानणारा हा धर्म आहे. बिगर मुस्लीम समाजाने याबाबत विचार करू नये. मात्र हा असा धर्म आहे जो समाज अंगिकारू शकतो.
टीकेचा भडिमार
मोहम्मदच्या लिंक्डइन प्रोफाईलमध्ये दिलेल्या माहितीनुसार तो बॅचलर ऑफ सायन्सचा विद्यार्थी आहे. त्याने मुस्लीम विद्यार्थ्यांच्या एका संमेलनात अमेरिकेला कॅन्सर असं म्हटले आहे. इस्लाम हा एकमेव असा धर्म आहे जो समाज अंगिकारू शकतो. आपण त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. मोहम्मदचे हे भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर त्याच्यावर आता टीकेचा भडीमार होत आहे. त्याला देश सोडून जायचा सल्ला अनेकजण देत आहेत. आमचा देश सोडून जा आणि पुन्हा येथे पाऊल ठेवायची गरज नाही, असं नेटकरी त्याला सांगत आहेत. त्याची स्कॉलरशिप आणि विद्यार्थी व्हिसा तातडीने रद्द केला पाहिजे अशीही मागणी काहींनी केली आहे. अमेरिका तुला कॅन्सर वाटते, तर कशाला इथे राहतोस? असेही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.