पाकिस्तानच्या दिवाळखोरीचा फटका नौदलाला

सध्या पाकिस्तान आर्थिक संकटातून जात आहे. नित्याचा कारभार हाकण्यासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारकडे पुरेसा निधी नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे सतत पाठपुरावा करूनही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही. या सर्व परिस्थितीचा फटका पाकिस्तानच्या नौदलाला बसला आहे. पाकिस्तानी नौदलाकडील पाणबुड्यांसाठी आवश्यक उपकरणांची मागणी ग्रीसने नाकारली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 7 Apr 2023
  • 12:24 pm
पाकिस्तानच्या दिवाळखोरीचा फटका नौदलाला

पाकिस्तानच्या दिवाळखोरीचा फटका नौदलाला

भारताच्या सूचनेनंतर ग्रीसने नाकारली मदत

#इस्लामाबाद

सध्या पाकिस्तान आर्थिक संकटातून जात आहे. नित्याचा कारभार हाकण्यासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारकडे पुरेसा निधी नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे सतत पाठपुरावा करूनही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही. या सर्व परिस्थितीचा फटका पाकिस्तानच्या नौदलाला बसला आहे. पाकिस्तानी नौदलाकडील पाणबुड्यांसाठी आवश्यक उपकरणांची मागणी ग्रीसने नाकारली आहे. त्यामुळे आवश्यक उपकरणांशिवाय या पाणबुड्या खेळण्या बनल्या असल्याची भावना नौदलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.  

आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानमध्ये सध्या माजी पंतप्रधान इम्रान खान आणि विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यात रंगलेला संघर्ष जगासाठी मनोरंजनाचा विषय बनला आहे. दहशतवादाची पाठराखण करण्याच्या सवयीमुळे जगातील अनेक देशांनी पाकिस्तानला मदत द्यायचे नाकारले आहे. पाकिस्तानच्या संरक्षण दलांना याचा फटका बसत आहे. विशेषतः पाकिस्तानच्या नौदलाला याची सर्वाधिक झळ बसली आहे. पाकिस्तानच्या पाणबुड्यांसाठी आवश्यक बॅटरी, इंजिन व अन्य उपकरणांचा पुरवठा करणाऱ्या ग्रीसने ही सामग्री पाकिस्तानला द्यायचे नाकारले आहे. आवश्यक उपकरणे नसल्याने पाणबुड्यांचे वरचेवर सांगाडे होताना दिसून येत आहेत. पाकिस्तानच्या चालू पानबुड्यांसाठी बॅटरी नाहीत. नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या पानबुड्यांसाठी इंजिन नाहीत.पाकिस्तानकडे असलेल्या पाच पानबुड्यांमध्ये बॅटरींची कमतरता आहे. पाण्याखाली ऑपरेट करण्यासाठी पाणबुडीला वीजेची आवश्यकता असते. परंतु आर्थिक संकटामुळे पाकिस्तानकडे वीज उपलब्ध नसते. त्यासाठी आवश्यक बॅटरीचा पुरवठा करण्यास ग्रीसने नकार दिला आहे.

आर्थिक संकटामुळे पाकिस्तानला शस्त्रास्त्र सामग्री पुरवणाऱ्या देशांनी पाकिस्तानकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारने ग्रीसकडे मदत मागितली होती. बॅटरीसाठी पाकिस्तानने ग्रीसकडे हात पसरले खरे. मात्र दहशतवादाची पाठराखण करणाऱ्या पाकिस्तानला लष्करी सामग्री पुरवणे जागतिक शांततेसाठी घातक ठरू शकते, अशी सूचना भारताने केली आहे. त्यांनतर ग्रीसने त्यांची मागणी फेटाळून लावली आहे. भारत-ग्रीस संबंधांमुळेच पाकिस्तानची मागणी ग्रीसने धुडकावली असल्याचे सांगितले जात आहे. मागच्याच वर्षी भारताने ग्रीसला पाकिस्तानला कसलीही शास्त्रास्त्रविषयक मदत देऊ नये, अशी  विनंती केली होती. सुरक्षेसंबंधीच्या उपकरणांमध्ये पाकिस्तानला ग्रीसने मदत करु नये, अशी भारताची भूमिका होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest