इम्रान खान यांच्यावर खुनाचा गुन्हा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या ४०० कार्यकर्त्यांवर खून आणि दहशतवाद माजवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाहोर पोलिसांनी इम्रानखान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या १०० कार्यकर्त्यांना अटक केली आहे. पोलीस आणि इम्रानखान यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याने ही अटक करण्यात आली आहे. या झटापटीत पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sat, 11 Mar 2023
  • 07:51 am
इम्रान खान यांच्यावर खुनाचा गुन्हा

इम्रान खान यांच्यावर खुनाचा गुन्हा

पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या १०० कार्यकर्त्यांना अटक

#लाहोर

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या ४०० कार्यकर्त्यांवर खून आणि दहशतवाद माजवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाहोर पोलिसांनी इम्रानखान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या १०० कार्यकर्त्यांना अटक केली आहे. पोलीस आणि इम्रानखान यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याने ही अटक करण्यात आली आहे. या झटापटीत पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या एका  कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. 

 तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे नेते फवाद चौधरी यांनी या कारवाईबद्दल जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, आमच्या कार्यकर्त्याच्या मृत्यूबद्दल पोलिसांवर कारवाई करण्याऐवजी त्यांनी आमचे नेते इम्रान खान आणि ४०० कार्यकर्त्यांवर खुनाचा आरोप ठेवला आहे. 

८ मार्च रोजी तेहरिक-ए-इन्साफचे कार्यकर्ते इम्रान यांच्या निवासस्थानापासून रॅली काढणार होते. त्यामुळे लाहोरमध्ये १४४ कलम लागू केले. त्यामुळे कार्यकर्ते जमान पार्कच्या बाहेर जमले. त्यावेळी पोलिसांशी झालेल्या झटापटीत अली बिलाल हा मारला गेला. त्या वेळी अनेक कार्यकर्ते जखमी झाले. कार्यकर्त्यांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. यामध्ये अकरा पोलीस जखमी झाले.  कार्यकर्त्यांना हटविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याचा मारा केला. ही झटापट वाढून हिंसा होऊ नये यासाठी इम्रान यांनी रॅली रद्द केली. 

शाहबाज शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज गट) सत्तेवर आल्यापासून गेल्या अकरा महिन्यांत विविध कारणांसाठी सरकारने इम्रान खान यांच्यावर ८० गुन्हे दाखल केले आहेत. 

याबाबत इम्रान खान म्हणाले की, पंजाबमधील निवडणुका होऊ नये यासाठी सरकार वेगवेगळी कारणे पुढे करत आहे. पोलिसांनी आमच्या पक्षाच्या १०० कार्यकर्त्यांना अटक केली आहे. वातावरण बिघडवून निवडणूक टाळण्याचे सरकारचे प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest