बहुरूपी ड्रग तस्कराला अटक
बहुरूपी ड्रग तस्कराला अटक
#बँकॉक
'डॉन को बारा मुल्क की पुलिस ढुंढ रही है' हा डायलॉग आपल्याला ठावूक आहे. पण एका ड्रग तस्कराला खरोखरीच थायलंड, कोरिया आणि चीन या तीन देशांची पोलीस यंत्रणा शोधत होती आणि हा पठ्ठ्या त्यांच्या हातावर तुरी देत राहिल्याचे आपल्याला माहिती नसणार. सहारत सवंगजेंग असे या महाठगाचे नाव आहे. त्याला अखेर बँकॉक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
थायलंड, कोरिया, चीन आणि अनेक देशांच्या सुरक्षा यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. मात्र तो ताब्यात येत नव्हता. कारण तो प्लास्टिक सर्जरी करायचा. त्याने त्याच्या चेहरा एवढ्या वेळा बदलला की आपला मूळचा चेहरा कसा होता, हे त्याचे त्याला आठवत नव्हते. या सगळ्या देशांच्या पोलीस यंत्रणांनी त्याला पकडण्यासाठी जंग जंग पछाडले होते. त्याचे पोस्टर छापून प्रसिद्ध केले. त्याला पकडून देणाऱ्याला मोठे बक्षीस जाहीर केले. सगळे उपाय करून झाले. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्याला बँकॉक पोलिसांनी अटक केली. अटक टाळण्यासाठी सहारत कधी चीनी नागरिक बनला तर कधी कोरियन नागरिक बनला, कधी त्याने भारतीय नागरिक असल्याचे सोंग घेतले होते.
तो आपले रुपडे बदलण्यात इतका पारंगत होता की पोलीस त्याचे छायाचित्र अथवा पोस्टर प्रकाशित करायची तोवर याने नवा अवतार धारण केलेला असायचा.त्याने यांच्या नावाची खोटी कागदपत्र तयार करून ठेवली होती. यासाठी त्याने आजवर कोट्यवधी रुपये उधळले होते. ड्रॅग तस्करीतून अमाप पैसा कमावला होता. प्लास्टिक सर्जरीसाठी खासगी तज्ञांची फौज बाळगली होती. त्याला नव्याने आयुष्याची सुरुवात करायची होती. यासाठी तो आपल्या संपत्तीसह बँकॉकला आला होता. दुर्दैवाने तो पकडला गेला आणि त्यांचे शांततत जगण्याचे स्वप्न भंगले.