राक्षसी लष्करी खर्च ...
अमेरिकेशी दोन हात करण्याची आकांक्षा असलेल्या चीनने नुकताच आपला अर्थसंकल्प सादर केला. त्यात लष्करावरील खर्चासाठी वाढीव तरतूद करण्यात आली. चीनने यंदा लष्करासाठी २०० अब्ज पौंडची तरतूद केली असल्याचा अंदाज आहे. ही जगातील सर्वात मोठी लष्करी तरतूद ठरली आहे. २०२२ साली चीनने लष्करासाठी १९० अब्ज पौंडची तरतूद केली होती. या वर्षी त्यात ७.१ टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याची माहिती चीनच्या सत्ताधारी पक्षाचे म्हणजेच नॅशनल पीपल्स पार्टीचे प्रवक्ते वांग चाओ यांनी दिली होती.