मायक्रोसॉफ्टची कर्मचारी कपात धडाक्यात सुरूच
#वॉशिंग्टन
मोठ्या कंपन्यांमध्ये नोकर कपातीची प्रक्रिया सुरू आहे. अमेझॉन, गुगल, ट्विटर, मेटा यांसारख्या कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांत अनेक टप्प्यांत कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. जानेवारीमध्ये १० हजार कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा करणार्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीने सोमवारी (१० जुलै) २७६ कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. कंपनीच्या दीर्घकालीन कामगारकपातीच्या धोरणानुसार हा निराळा न्याय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.
इतर अनेक कंपन्यांप्रमाणेच मायक्रोसॉफ्टनेही कामगारकपात होणार असल्याचे स्पष्ट केले होते, त्यानुसार या टप्प्यात एकूण २७६ कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले आहे. यातील बहुतेक प्रभावित कर्मचारी ग्राहक सेवा आणि विक्रीशी संबंधित आहेत. कंपनीने जानेवारीमध्ये जाहीर केलेल्या १० हजार नोकर कपाती व्यतिरिक्त या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. हे कर्मचारी अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये काम करत होते. बेल्लेव्ह्यू आणि रेडमंड कार्यालयातील २१० आणि ६६ कर्मचार्यांवर या कपातीचा परिणाम होतो. आगामी काळात कंपनीचे हित आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन असे निर्णय घेत राहणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. मे महिन्याच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्टने एकूण १५८ कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. ही कपात जानेवारीत प्रस्तावित केलेल्या कपातीपेक्षा वेगळी होती. याचा परिणाम वॉशिंग्टनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर झाला. वृत्तसंस्था