'केएलएफ'चा सदस्य अवतार सिंग खांडा मृत्युमुखी

इंग्लडमधील खलिस्तानी लिबरेशन फोर्सचा म्होरक्या (केएलएफ) अमृतपाल सिंगचा मुख्य सहकारी अवतार सिंग खांडाचा मृत्यू झाला आहे. भारतविरोधी कारवाया कारवाई टाळण्यासाठी खांडानेच अमृतपाल सिंगला मार्च-एप्रिल महिन्यात ३७ दिवस पोलिसांपासून लपवून ठेवले होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 16 Jun 2023
  • 12:37 am
'केएलएफ'चा सदस्य  अवतार सिंग खांडा मृत्युमुखी

'केएलएफ'चा सदस्य अवतार सिंग खांडा मृत्युमुखी

भारतीय उच्चायुक्तालयावरील तिरंगा खेचला होता खाली

#लंडन

इंग्लडमधील खलिस्तानी लिबरेशन फोर्सचा म्होरक्या (केएलएफ) अमृतपाल सिंगचा मुख्य सहकारी अवतार सिंग खांडाचा मृत्यू झाला आहे. भारतविरोधी कारवाया कारवाई टाळण्यासाठी खांडानेच अमृतपाल सिंगला मार्च-एप्रिल महिन्यात ३७ दिवस पोलिसांपासून लपवून ठेवले होते.

विषबाधा झाल्यामुळे अवतारसिंग खांडा मेल्याचा संशय व्यक्त केला जात असतानाच त्याला रक्ताचा कर्करोग असल्याची माहिती समोर आली आहे. उपचारांसाठी त्याला बर्मिंगहॅम येथील सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.  या ठिकाणीच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. खांडा हा बॉम्बतज्ञ होता.

१९ मार्च रोजी खलिस्तान्यांनी  लंडनमधील भारताच्या उच्चायुक्तालयावरील भारताचा राष्ट्रध्वज खाली खेचला होता. या प्रकरणाचा तो मुख्य सूत्रधार होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) या घटनेशी संबंधित मुख्य आरोपी म्हणून खांडा आणि इतर तीन फुटीरतावाद्यांची ओळख पटवली होती. केएलएफचा दहशतवादी कुलवंत सिंग याचा खांडा हा मुलगा होता. तो सन २००७ मध्ये इंग्लडला उच्चशिक्षणासाठी गेला होता. त्यानंतर तो २०१२ मध्ये खलिस्तानी चळवळीत सामिल झाला. खांडा हा केएलएफमध्ये रंजोध सिंह या नावाने वावरत होता. त्यानेच अमृतपाल सिंग याला वारीस पंजाबचा प्रमुख बनवण्यात मुख्य भूमिका बजावली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest