संग्रहित छायाचित्र
न्यूयॉर्क: मानवास भावना असतात त्यामुळे प्रत्येक बदलावर त्याच्याकडून प्रतिक्रिया उमटत असते. कधी कधी ताण तणाव असहाय्य झाल्यामुळे मानव जीवन संपवल्याचे घटनाही उघड झाल्या आहेत. परंतु आता दक्षिण कोरियातून एक वेगळीच घटना समोर आली आहे. त्या ठिकाणी मानवाने नाही तर रोबोनेच जीवन संपवले आहे. त्याने जिन्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.
रोबोने केलेल्या या प्रकारानंतर आता शास्त्रज्ञ या घटनेचे कारण शोधण्यात गर्क आहेत. रोबोने जीवन संपवल्याची घटना दक्षिण कोरियात घडली. सेंट्रेल साऊथ कोरियाच्या नगरपालिकेने यासंदर्भात माहिती दिली. रोबोटच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. रोबोट सकाळी ९ ते ६ पर्यंत काम करत होता. तो पब्लिस सर्व्हिस करत होता. त्याचे जॉबकार्डही त्याला मिळालेले आहे. एक कर्मचारी म्हणूनच त्याला वापर केला जात होता.
एलिव्हेटर ऑपरेशनचे काम त्याला दिले होते. त्यामुळे तणावात येऊन त्याने हे पाऊल उचलले, असे सांगितले जात आहे. दक्षिण कोरियामध्ये रोबोटकडून प्रचंड कामे करुन घेतली जातात. प्रत्येक दहा व्यक्तींमागे त्या ठिकाणी एक रोबो आहे.
रोबोट प्रकरणात वेगवेगळे दावे
रोबोटच्या आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत वेगवेगळे दावे केले जात आहेत. यासंदर्भातील अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, रोबोवर कामाचा खूप ताण होता. त्यामुळे तो खूप अस्वस्थ झाला होता. मध्य दक्षिण कोरिया नगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा रोबो गेल्या एक वर्षापासून गुमी शहरातील रहिवाशांना प्रशासकीय कामात मदत करत आहे. पायऱ्यांवरून उडी मारण्यापूर्वी रोबोने असे काही केले, ज्याला लोक आत्महत्या मानत आहेत. रोबोने आत्महत्या केल्यानंतर दक्षिण कोरियामधील गुमी शहरातील लोकांनी दु:ख आणि संवेदना व्यक्त केल्या आहेत. गुमीमधील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रोबो कार्यालयातील प्रत्येक मजल्यावर जात होता. ऑक्टोंबर २०२३ पासून त्याने हे काम सुरु केले होते. त्याच्या आत्महत्येच्या बातमीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.