आमचाही सन्मान करायला शिका

सहसा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दोन देशांचे नेते परस्परांशी गोडीगुलाबीनेच वर्तन करतात. अशा ठिकाणी तक्रारीचा सुरु काढला जात नाही. मात्र नुकतेच कांगोच्या राष्ट्रपती फेलिक्स त्सेसेकेदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात संयुक्त पत्रकारपरिषदेत जो संवाद झाला, या संवादाचे पडसाद तिथे उपस्थित विविध देशांच्या पत्रकारांमध्येही उमटले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 9 Mar 2023
  • 04:34 pm
आमचाही सन्मान करायला शिका

आमचाही सन्मान करायला शिका

कांगोच्या राष्ट्रपतीने मॅक्रॉन यांना सुनावले खडे बोल; म्हणाले पूर्वग्रह सोडा व बरोबरीने वागवा

#किंशासा

सहसा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दोन देशांचे नेते परस्परांशी गोडीगुलाबीनेच वर्तन करतात. अशा ठिकाणी तक्रारीचा सुरु काढला जात नाही. मात्र नुकतेच कांगोच्या राष्ट्रपती फेलिक्स त्सेसेकेदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात संयुक्त पत्रकारपरिषदेत जो संवाद झाला, या संवादाचे पडसाद तिथे उपस्थित विविध देशांच्या पत्रकारांमध्येही उमटले. या परिषदेत फेलिक्स त्सेसेकेदी यांनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांना, आमच्याशी बरोबरीच्या नात्याने वागा, आम्हाला सन्मान द्या, आमच्याकडे आता पूर्वगृहदूषित दृष्टीकोनातून पाहू नका, असे खडे बोल सुनावले. फेलिक्स त्सेसेकेदी यांच्या या अवतारामुळे इमॅन्युएल मॅक्रॉनही काही क्षण गोंधळून गेले होते.

कांगो हा आफ्रिकन समूहातील एक देश आहे. आफ्रिकी देशांवर फ्रान्स आणि बेल्जीयमची सत्ता होती. इतर अनेक आफ्रिन देशांसारखीच कांगो ही फ्रान्सची वसाहत होती. त्यामुळे ज्याप्रमाणे सुरुवातीच्या काळात इंग्लड आपल्या वसाहती असलेल्या देशांशी वर्तन करत होते, तसेच वर्तन फ्रान्सकडून या वसाहतींखालील देशांशी करत असते. हा संदर्भ देत कांगोच्या राष्ट्रप्रमुखांनी फ्रान्सच्या राष्ट्रप्रमुखाला झापले. तुम्ही आमच्याशी आजवर ज्या पद्धतीने वागत आलेले आहात, ते वागणे सोडून द्या. आज काळ बदलला आहे, आम्हीही झपाट्याने बदलले आहोत, असे सांगत फेलिक्स त्सेसेकेदी यांनी वसाहतींखालील देशांच्या आत्मसन्मानावर कधीकाळच्या प्रस्थापित देशांची कान उघडणीच केली.  

आफ्रिकन देश हे काही आता तुमची वडिलोपार्जित मालमत्ता राहिलेले नाहीत. ते स्वतंत्र आहेत, आधुनिक आहेत, तुमच्यासारखेच जागतिक घडामोडीत सहभागी होणारे भागीदार देश आहे.  आता ना साम्राज्ये राहिली, ना वसाहती राहिल्या. त्यामुळे तुम्ही आम्हाला बरोबरीच्या नात्याने वागणार, असेही या पत्रकारांसमोर फेलिक्स त्सेसेकेदी यांनी सांगितले. दरम्यान फेलिक्स त्सेसेकेदी यांचा गैरसमज झालेला आहे. माध्यमांच्या चुकीच्या वार्तांकनामुळे हा प्रकार घडला आहे. फ्रान्स आपल्या लष्करी छावण्या बंद करून तिथे स्थानिकांसाठी लष्करी प्रशिक्षण केंद्र सुरु करणार असल्याचा खुलासा  इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केला.

वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest