'सनशाईन'वर आढळला सर्वात मोठा साप
#कॅनबेरा
साप समोर दिसला की अनेकांची पळता भुई झाल्याशिवाय राहत नाही. अशातच तो साप जर विषारी तर अनेकांच्या अंगावर काटे उभे राहतात. अजगर, अॅनाकोंडा किंवा किंग क्रोब्रा या सापांच्या जवळ जायचे धाडस कोणीच दाखवत नाही. ऑस्ट्रेलियातील क्वीन्स सनशाईन या समुद्रकिनाऱ्यावर अशाच प्रकारचा एक महाकाय विषारी साप आढळल्याने खळबळ उडाली आहे. या समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेलेल्या पर्यटकांना हा साप दिसला. किनाऱ्यावरील सर्पमित्र स्टीवर्ट मॅकेंजी यांनी सांगितले की, हा साप जखमी झालेल्या अवस्थेत होता.
हा साप नक्कीच अस्वस्थ होता. त्या सापाच्या अंगावर मोठी जखम होती. कोणत्या तरी धारदार वस्तूने या सापाचा एक भाग कापला गेला असेल. सापाला वाचवणे शक्य आहे का, याबाबत माझा गोंधळ उडाला होता. पण मी त्या सापाला वन्य प्राण्यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. हा विशाल साप कमीत कमी १० वर्षांचा असू शकतो. याचे वजन २ ते ४ किलो आणि लांबी १ मीटरहून जास्त आहे. समुद्रकिनारी आढळणाऱ्या सापांपासून दूर राहण्याचे आवाहन स्टीवर्ट यांनी केले आहे.