कॅलिफोर्नियात गुरुद्वारासमोर खलिस्तान्यांचा गोळीबार

गेल्या काही दिवसांपासून खलिस्तान समर्थक आणि वारीस पंजाब दे संघटनेचा म्होरक्या अमृतपाल सिंग फरार असून त्याचा शोध पंजाब पोलीस घेत आहेत. या पार्श्वभूमीवर खलिस्तान समर्थक संघटनांनी विविध देशात सुरू केलेल्या हिंसाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच अनुषंगाने कॅलिफोर्नियाच्या सॅक्रामँटोमधील एका गुरुद्वारासमोर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. खलिस्तानी समर्थकांनी हा गोळीबार केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 28 Mar 2023
  • 03:19 pm
कॅलिफोर्नियात गुरुद्वारासमोर खलिस्तान्यांचा गोळीबार

कॅलिफोर्नियात गुरुद्वारासमोर खलिस्तान्यांचा गोळीबार

सॅक्रामँटो काऊंटीत घडला प्रकार; दोन जण गंभीर जखमी, एका मारेकऱ्यास अटक

#कॅलिफोर्निया

गेल्या काही दिवसांपासून खलिस्तान समर्थक आणि वारीस पंजाब दे संघटनेचा म्होरक्या अमृतपाल सिंग फरार असून त्याचा शोध पंजाब पोलीस घेत आहेत. या पार्श्वभूमीवर खलिस्तान समर्थक संघटनांनी विविध देशात सुरू केलेल्या हिंसाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच अनुषंगाने कॅलिफोर्नियाच्या सॅक्रामँटोमधील एका गुरुद्वारासमोर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. खलिस्तानी समर्थकांनी हा गोळीबार केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हा गोळीबार करणाऱ्या व्यक्ती जखमी व्यक्तींना ओळखतात, अशी माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी लंडनमधील भारतीय दूतावासाबाहेर खलिस्तानी समर्थकांनी गोंधळ घातला होता. तसेच, भारताचा तिरंगा खाली उतरवण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. या प्रकरणाचे तीव्र पडसाद भारतात उमटले होते. भारताने आपली नाराजीही ब्रिटिश सरकारला कळवली होती. या पार्श्वभूमीवर कॅलिफोर्नियामध्ये घडलेल्या या घटनेमध्ये खलिस्तानी समर्थकांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

स्थानिक पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास चालू असून गोळीबार करणाऱ्यांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनेसंदर्भातला एक व्हीडीओ शेखर पुजारी नावाच्या एका व्यक्तीने ट्विटरवर पोस्ट केला आहे. दरम्यान, या प्रकारामध्ये जखमी झालेल्या दोन्ही व्यक्तींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार चाालू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हल्लोखोर आणि जखमी व्यक्ती एकमेकांचे परिचित असल्याचे सांगितले जात असून  हल्ल्याचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. एका हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसरा हल्लेखोर फरार झाला आहे.वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest