'जॉन्सन बेबी' ला १५४ कोटींचा दंड
#न्यूयॉर्क
लहान मुलांच्या त्वचेची योग्य काळजी घेतली नाही किंवा चुकीचे उत्पादन वापरले गेले तर त्याचे परिणाम किती भयानक होऊ शकतात. याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. असेच एक प्रकरण समोर आले आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या पावडरमुळे एका व्यक्तीला कर्करोग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेतील न्यायालयाने कंपनीला १५४ कोटींचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.
जॉन्सन अँड जॉन्सन ही कंपनी लहान मुलांसाठी पावडर बनवण्यासाठी जगभर ओळखली जाते. अमेरिकेतील न्यायालयाने कंपनीला एका व्यक्तीला १५४ कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. या व्यक्तीने जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरमुळे कर्करोग झाल्याचा आरोप करत कंपनीवर दावा दाखल केला होता. अँथनी हर्नांडेझ व्हॅलाडेझ नावाच्या व्यक्तीने कंपनीवर कर्करोग झाल्याचा आरोप केला होता. या व्यक्तीने कंपनीवर गुन्हा दाखल करून आरोप केले. व्हॅलाडेझ यांनी लहानपणापासून जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचा वापर केला होता. या पावडरमुळे त्यांना कर्करोग झाला. या पावडरचा दीर्घकाळ वापर केल्यामुळे त्याच्या छातीजवळ मेसोथेलियोमा नावाचा कर्करोग झाला, असे व्हॅलाडेझने न्यायालयात सांगितले.
काय आहे कंपनीचे स्पष्टीकरण ?
कंपनीने न्यायालयात स्पष्टीकरण दिले असले तरी जॉन्सन अँड जॉन्सनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंपनीची पावडर पूर्णपणे सुरक्षित आहे. कारण ती विशेष पांढऱ्या बाटल्यांमध्ये पॅक करून विकली जाते. अशा प्रकारच्या सुरक्षिततेनंतर आमच्या उत्पादनातून कोणालाही कर्करोग होऊ शकत नाही. कंपनी या खटल्यासाठी लागलेले कायदेशीर शुल्क आणि खटल्यातील इतर खर्च टाळण्यासाठी या प्रकरणात तोडगा काढणार आहे. याआधीही जॉन्सन अँड जॉन्सनच्या उत्पादनांबाबत काही प्रकरणे समोर आली आहेत ज्यात कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागली होती. या प्रकरणातही पीडित व्यक्तीला सुमारे दोन वर्षे प्रदीर्घ लढा द्यावा लागला. दोन वर्षांच्या लढ्यानंतर न्यायालयाने निकाल देताना कंपनीला १५४ कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.