गाझा पट्टीतील शाळेवर इस्राएलचा हल्ला, ३३ जण ठार

गाझा पट्टीतील मध्य भागात असलेल्या शाळेवर इस्राएलने गुरुवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात १४ मुले आणि नऊ महिलांसह ३३ जण ठार झाले आहेत. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असून पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विस्थापितांनी शाळांमध्ये आश्रय घेतला होता. इस्राएली लष्कराचा दावा आहे की हमासचे दहशतवादी शाळेतून त्यांच्या कारवाया करत होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Sat, 8 Jun 2024
  • 07:07 pm
33 people were killed  Israeli attack

संग्रहित छायाचित्र

मृतांमध्ये १४ मुलांचा समावेश, शाळेत विस्थापित असल्याचा दावा

#देर अल-बलाह (गाझा पट्टी)
गाझा पट्टीतील मध्य भागात असलेल्या शाळेवर इस्राएलने गुरुवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात १४ मुले आणि नऊ महिलांसह ३३ जण ठार झाले आहेत. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असून पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विस्थापितांनी शाळांमध्ये आश्रय घेतला होता. इस्राएली लष्कराचा दावा आहे की हमासचे दहशतवादी शाळेतून त्यांच्या कारवाया करत होते.

हॉस्पिटलमधील रेकॉर्ड आणि असोसिएटेड प्रेसच्या पत्रकाराने सांगितले की, हल्ल्यात १४ मुले आणि नऊ महिलांसह किमान ३३ लोक मरण पावले आहेत. रात्री घरावर झालेल्या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. गाझामधील अनेक निर्वासित शिबिरांपैकी एक असलेल्या नुसरतमध्ये दोन्ही हल्ले झाले.

इस्राएलने गाझा पट्टीमध्ये आपले आक्रमण वाढवल्यामुळे आश्रय शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या पॅलेस्टिनी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची ही नवीन घटना होती. काही दिवसांपूर्वी, लष्कराने मध्य गाझामध्ये नवीन ठिकाणी जमिनीवरून आणि हवाई हल्ल्याची घोषणा केली. त्यांनी हमासच्या अतिरेक्यांचा पाठलाग केल्याने ते पुन्हा संघटित झाल्याचे म्हटले आहे.

समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या छायाचित्रांमध्ये रुग्णालयाच्या अंगणात ब्लँकेटमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळलेले मृतदेह रांगेत ठेवलेले दिसतात. इस्राएली सैन्याने गाझा पट्टीच्या या भागात यापूर्वीही हल्ले केले होते. प्रत्यक्षदर्शी आणि रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहाटेच्या सुमारास अल-सर्दी शाळेवर हल्ला केला. ही शाळा युनायटेड नेशन्स एजन्सी फॉर पॅलेस्टिनी निर्वासितांद्वारे चालविली जाते. गाझा शहरातून विस्थापित झाल्यानंतर शाळेत आश्रय घेतलेल्या अयमान रशीदने सांगितले की, क्षेपणास्त्रांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील वर्ग खोल्यांना लक्ष्य केले. येथे निर्वासित कुटुंबे आश्रय घेत होती. या घटनेचे अनेक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात अनेक जखमी लोक हॉस्पिटलच्या मजल्यावर उपचार घेत आहेत. जनरेटरसाठी इंधनाचा पुरवठा मर्यादित असल्याने रुग्णालयातील बहुतांश भागात वीज नाही. वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest