Pakistan : पाकिस्तानमध्ये लष्करापेक्षा दहशतवाद्यांकडे चांगली शस्त्रे

पाकिस्तानचे सुरक्षातज्ज्ञ रफिकउल्ला काकर म्हणाले, ‘‘तालिबानला आता हवाई हल्ल्याचा धोका नाही, कारण अमेरिका अफगाणिस्तानातून हटली आहे. पारंपरिक युद्धात शस्त्रांचा दर्जा खूप महत्त्वाचा असतो. या बाबतीत आता दहशतवाद्यांनी बाजी मारली आहे. पाकिस्तानी लष्कराकडे दर्जेदार शस्त्रे, उपकरणे आणि तंत्रज्ञान नाही. त्यामुळे दहशतवादी दररोज हल्ले करतात आणि पाकिस्तानचे सैनिक मारले जातात.’’

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 9 May 2023
  • 02:22 pm
पाकिस्तानमध्ये लष्करापेक्षा दहशतवाद्यांकडे चांगली शस्त्रे

पाकिस्तानमध्ये लष्करापेक्षा दहशतवाद्यांकडे चांगली शस्त्रे

अमेरिकन शस्त्रे घेऊन तालिबानचे हल्ले, दोन आठवड्यांत २१ सैनिकांना मारले

एका वर्षामध्ये दहशतवादी हल्ल्यांत ४१९ ठार

पाकिस्तानचे सुरक्षातज्ज्ञ रफिकउल्ला काकर म्हणाले, ‘‘तालिबानला आता हवाई हल्ल्याचा धोका नाही, कारण अमेरिका अफगाणिस्तानातून हटली आहे. पारंपरिक युद्धात शस्त्रांचा दर्जा खूप महत्त्वाचा असतो. या बाबतीत आता दहशतवाद्यांनी बाजी मारली आहे. पाकिस्तानी लष्कराकडे दर्जेदार शस्त्रे, उपकरणे आणि तंत्रज्ञान नाही. त्यामुळे दहशतवादी दररोज हल्ले करतात आणि पाकिस्तानचे सैनिक मारले जातात.’’

तालिबान आता त्यांना पाहिजे तिथे हल्ले करत आहेत. त्यांनी गुरुवारीच ७  जवानांना ठार केले. आता दहशतवाद्यांऐवजी लष्कराला जीव गमवावा लागत आहे. फेब्रुवारीमध्ये मशिदीवर हल्ला झाला होता. त्यात तब्बल १०७ पोलीस शहीद झाले. रोज सैनिक मारले जात आहेत. एका वर्षात दहशतवादी हल्ल्यांमध्ये ३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दरम्यान ४१९ जणांचा मृत्यू झाला. यापैकी ६५ टक्के सैनिक किंवा पोलीस होते, असेही काकर यांनी सांगितले

लष्कर कमकुवत झाल्याने पाक-चीन संबंध बिघडले

रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये सुमारे ७.२ अब्ज डॉलरची शस्त्रे आणि इतर उपकरणे सोडली आहेत. प्रत्यक्षात ही रक्कम जवळपास दुप्पट आहे. पाकिस्तानचे वार्षिक संरक्षण बजेटही तेवढे नसते. तालिबान पाक लष्कराला तर बलुचिस्तान लिबरेशन आर्मी  चीनने गुंतवणूक केलेल्या ठिकाणांना लक्ष्य करत आहे. चिनी नागरिकही मारले जात आहेत. या हल्ल्यांमुळे चीन आणि पाकिस्तानमधील संबंधही बिघडत आहेत. दोन वर्षांत २३ चिनी नागरिक दहशतवादी हल्ल्यात मारले गेले आहेत.

#पेशावर

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा राज्यातील खुर्रम जिल्ह्यात मागील आठवड्यात दहशतवादी हल्ल्याच्या दोन घटना घडल्या. त्याच आठवड्यात एका दहशतवादी हल्ल्यात ८ शिक्षक तसेच ७ जवान शहीद झाले होते. या राज्यात मागील दोन आठवड्यांत एकूण २१ पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत. प्रत्युत्तरात पाक लष्कराला केवळ दोन दहशतवादी टिपण्यात यश आले. यामागे एक महत्त्वाचे कारण आहे, ते म्हणजे पाकिस्तानी लष्करापेक्षा दहशतवाद्यांकडे असलेली चांगल्या दर्जाची शस्त्रे. चांगली शस्त्रे नसल्याने पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईची तीव्रता कमी झाली आहे.

अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या या राज्यात पाकिस्तानी लष्कर दोन महिन्यांपासून कारवाया करत आहे. आतापर्यंत तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेचा वरचष्मा दिसत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे टीटीपीकडे पाकिस्तानी सैन्यापेक्षा चांगली शस्त्रे आणि हत्यारे आहेत. ही तीच शस्त्रे आहेत जी अमेरिकन सैन्याने ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानातून परतताना सोडून दिली होती.

तालिबानशी संबंधित विषयांचे वार्तांकन करणारे पत्रकार कादिर युसुफझाई यांच्या मते, ‘‘आता पाकिस्तानी लष्कर बॅकफूटवर आले आहे.’’ सौदी अरेबियातील वृत्तपत्र 'द नॅशनल'ने केलेल्या तपासात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. त्यानुसार, तालिबानच्या बाबतीत पाकिस्तानची प्रत्येक चाल उलटी ठरत आहे. आता पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनीही हे मान्य केले आहे. टीटीपी आणि अफगाण तालिबान पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करत आहेत. दररोज पोलीस आणि लष्कराचे जवान मारले जात आहेत. एवढेच नाही तर बलुचिस्तानच्या बंडखोर संघटनांनीही त्यांच्याशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आता लष्कराचे मोठे नुकसान होत आहे.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest