संग्रहित छायाचित्र
ब्रिटनमध्ये सत्तांतर झाले असून भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा पराभव झाला आहे. हुजुर पक्षाच्या पराभवाची जबाबदारी सुनक यांनी स्वीकारली आहे. (Rishi Sunak)
किर स्टार्मर यांच्या मजूर पक्षाने ३५९ जागा जिंकल्या आहेत, तर पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजुत पक्षाला फक्त ऐंशी जागा मिळाल्या आहेत. एकूण ६५० जागांपैकी ५१५ जागांचा निकाल हाती आला आहे. त्यामुळे २०२४ च्या या सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाचा विजय निश्चित मानला जातोय.
गेल्या १४ वर्षांपासून सत्तेत असलेला हुजूर पक्ष आणि प्रमुख विरोधी मजूर पक्ष हे दोन मोठे पक्ष ब्रिटनमध्ये आहेत. तेथील सत्ता ही या दोन पक्षांपैकी एकाकडे असते. त्यातही हुजूर पक्षाला सत्तेत राहण्याची सर्वाधिक संधी ब्रिटनच्या जनतेने दिली आहे. सध्या हुजूर पक्षाचे नेतृत्व सुनक यांच्याकडे, तर मजूर पक्षाची धुरा एप्रिल २०२० पासून स्टार्मर यांच्याकडे आहे. स्टार्मर यांनी या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवलं असून सुनक यांच्या पक्षाला अवघ्या ८० जागांवर समाधान मानावे लागले आहे