अफगाणिस्तानात ८० मुलींना विषबाधा

अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीचा क्रूर चेहरा समोर आला आहे. मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी तालिबानी राजवटीकडून शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्यांवर खाद्यपदार्थातून विष देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अफगाणिस्तानमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल ऐंशी मुलींना विषबाधा झाल्याचे उघड झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 6 Jun 2023
  • 08:42 am

अफगाणिस्तानात ८० मुलींना विषबाधा

#काबूल

अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीचा क्रूर चेहरा समोर आला आहे. मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी तालिबानी राजवटीकडून शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्यांवर खाद्यपदार्थातून विष देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अफगाणिस्तानमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल ऐंशी मुलींना विषबाधा झाल्याचे उघड झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अफगाणिस्तानात यापूर्वीही शाळकरी मुलींना विषबाधा झाल्याचे प्रकार समोर आले होते. यावेळी ८० अफगाण मुलींना विषबाधा झाली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणयात आले आहे. संशयाची सुई तालिबानकडे वळत आहे. पण तालिबानने दावा फेटाळला आहे. या घटनेत तालिबानचा कोणताही सहभाग नसल्याचे म्हटले आहे. उत्तर अफगाणिस्तानमधील त्यांच्या प्राथमिक शाळांवर झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनेत सुमारे ८० मुलींना विषबाधा झाली आहे,  त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती एका स्थानिक शिक्षण अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

प्रांतीय शिक्षण विभागाचे संचालक मोहम्मद रहमानी यांनी सांगितले की, संघचारक जिल्ह्यात इयत्ता १ ते ६ मधील विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे. तसेच, नसवान-ए-कबोद आब शाळेतील ६० आणि नसवान-ए-फैजाबाद शाळेतील आणखी १७ मुलींना विषबाधा झाली होती. दोन्ही प्राथमिक शाळा एकमेकांच्या जवळ आहेत आणि त्यांना एकामागून एक लक्ष्य करण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला आहे. विभागाचा तपास चालू आहे आणि प्राथमिक चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानची राजवट आल्यापासून आणि अफगाण महिला, मुलींच्या अधिकारांवर तसेच स्वातंत्र्यावर अतिक्रमण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  मुलींच्या सहावीपर्यंतच्या शिक्षणावर बंदी घालण्यात आली आहे आणि महिलांना बहुतांश नोकऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest