Imran Khan in trouble again : इम्रान खान पुन्हा संकटात

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासमोरील संकटांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. राजकीय संघर्षात व्यस्त असलेल्या इम्रान खान यांच्या अडचणीत भर घालत मौलवी सईद यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. बुशरा बीबी आणि इम्रान यांचा विवाह कायदेशीर नव्हता. शरिया कायद्यानुसार हा निकाह झाला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 14 Apr 2023
  • 03:03 pm
इम्रान खान पुन्हा संकटात

इम्रान खान पुन्हा संकटात

बुशरासोबतचा विवाह बेकायदेशीर; मौलवी सईद यांची न्यायालयात माहिती

#इस्लामाबाद

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासमोरील संकटांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. राजकीय संघर्षात व्यस्त असलेल्या इम्रान खान यांच्या अडचणीत भर घालत मौलवी सईद यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. बुशरा बीबी आणि इम्रान यांचा विवाह कायदेशीर नव्हता. शरिया कायद्यानुसार हा निकाह झाला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

इम्रान खान आणि बुशरा यांचा निकाह लावून देणारे मौलवी मुफ्ती सईद यांनी सांगितले की, या दोघांचा विवाह इद्दतच्या अवधीत झाला होता. त्यामुळे हा विवाह बेकायदेशीर होता. इस्लाममधल्या शरिया कायद्यानुसार मुस्लीम महिलेचा जर तलाक झाला किंवा तिच्या पतीचा मृ्त्यू झाला असेल तर त्यानंतर जो एक विशिष्ट दिवसांचा कालावधी असतो त्याला 'इद्दत' असे म्हटले जाते. हा कालावधी १० दिवसांचा असतो. एखाद्या मुस्लीम महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर किंवा तिचा तलाक झाल्यानंतर दहा दिवसांची इद्दत असते. जर एखादी महिला गरोदर असताना विधवा झाली तर इद्दतचा कालावधी हा मुलाच्या जन्मापर्यंत चालतो. इस्लाममध्ये इद्दत पाळणे महिलांसाठी अनिवार्य आहे. या कालावधीत तलाक घेतलेली महिला किंवा विधवा दुसऱ्या पुरुषाशी लग्न करू शकत नाही.

दरम्यान इम्रान खान आणि बुशरा यांच्या विवाहाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या संदर्भातल्या एका अहवालात हे नमूद करण्यात आले आहे की, न्यायालयाची सुनावणी सुरू असतानाच इम्रान खान यांनी बुशरासोबत निकाह केला. महिलेने दिलेल्या आश्वासनानंतर २०१८ मध्ये मी इम्रान खान यांचा निकाह लावून दिला. लग्नानंतर हे दोघंही इस्लामाबादमध्ये राहू लागले होते. बुशरा यांनी या निकाहाच्या वेळी इद्दतचा कालावधी पूर्ण केला नव्हता, अशी माहिती सईद यांनी दिली आहे.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest