कॅनडामध्ये पुन्हा हिंदू मंदिर फोडले

कॅनडामध्ये पुन्हा एकदा एका हिंदू मंदिराची तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. ओंटारियो प्रांतातील विंडसर शहरामधील श्री स्वामी नारायण या हिंदू मंदिराची बुधवारी (५ एप्रिल) तोडफोड करण्यात आली असून मंदिरांच्या भिंतीवर द्वेषपूर्ण घोषणा लिहिण्यात आल्या आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 7 Apr 2023
  • 12:25 pm
कॅनडामध्ये पुन्हा हिंदू मंदिर फोडले

कॅनडामध्ये पुन्हा हिंदू मंदिर फोडले

विंडसर येथील स्वामीनारायण मंदिरात तोडफोड; भिंतीवर पुन्हा भारतविरोधी घोषणा

#ओंटारिओ

कॅनडामध्ये पुन्हा एकदा एका हिंदू मंदिराची तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. ओंटारियो प्रांतातील विंडसर शहरामधील श्री स्वामी नारायण या हिंदू मंदिराची बुधवारी (५ एप्रिल) तोडफोड करण्यात आली असून मंदिरांच्या भिंतीवर द्वेषपूर्ण घोषणा लिहिण्यात आल्या आहेत.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील दोन संशयितांचा शोध सुरू आहे. श्री स्वामीनारायण मंदिराच्या बाहेरील भिंतीवर काळ्या रंगात हिंदुविरोधी आणि भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. विंडसर पोलिसांनी सांगितले की, हिंदू मंदिराची तोडफोड ही द्वेषपूर्ण घटना म्हणून चौकशी केली जात आहे. प्राथमिक तपासात अधिकाऱ्यांनी एक व्हीडीओ मिळवला आहे. यामध्ये मध्यरात्री १२ नंतर दोन संशयित या परिसरात दिसले. त्यातील एक संशयित इमारतीच्या भिंतीची तोडफोड करताना दिसत आहे, तर दुसरा त्याच्या बाजूला उभा आहे. एका संशयिताने काळ्या रंगाचा स्वेटर, काळी पॅन्ट आणि रनिंग शूज घातले होते. तर दुसऱ्या संशयिताने काळी पॅन्ट, स्वेटर, काळे शूज आणि पांढरे मोजे घातले होते. कॅनडातील हिंदू मंदिरांमध्ये याआधीही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest