हिंदू वंशाच्या धर्मगुरूवर ब्रिटनमध्ये महिला शिष्यांचा लैंगिक छळाचा आरोप

ब्रिटनमधील भारतीय वंशाचे हिंदू धर्मगुरू राजिंदर कालिया यांच्यावर एका शिष्याने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. ‘द मिरर’ च्या वृत्तानुसार राजिंदरने प्रवचन, शिकवणींद्वारे शिष्यांवर चुकीच्या पद्धतीने प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला.

sexually harassing

हिंदू वंशाच्या धर्मगुरूवर ब्रिटनमध्ये महिला शिष्यांचा लैंगिक छळाचा आरोप

लंडन : ब्रिटनमधील भारतीय वंशाचे हिंदू धर्मगुरू राजिंदर कालिया यांच्यावर एका शिष्याने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. ‘द मिरर’ च्या वृत्तानुसार राजिंदरने प्रवचन, शिकवणींद्वारे शिष्यांवर चुकीच्या पद्धतीने प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला.

६८ वर्षीय कालियाचा असा दावा आहे की ते रुग्णांवर कोणतेही उपचार करू शकतात. त्यांनी बनावट व्हीडीओद्वारे लोकांना चमत्कार दाखवण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी लिंबातून रक्त काढून पाण्यात टाकण्याचा व्हीडीओ दाखवला.

मदतीच्या बहाण्याने राजिंदरने भारतीय वंशाच्या चार महिला शिष्यांवर बलात्कार केला. या चार महिलांनी राजिंदरविरोधात तक्रार दाखल केली आहे. राजिंदर अनेक वर्षांपासून त्यांचे शोषण करत असल्याचा आरोप तिघींनी केला आहे. याशिवाय तीन जणांकडून मोबदला न देता काम करून घेतल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे.

एका बलात्कार पीडितेने सांगितले की, ती लहान वयातच मुलासह राजिंदरच्या आश्रमात आली. ती दर आठवड्याला नियमितपणे तीन सत्रात सहभागी होऊ लागली. एके दिवशी राजिंदर आपल्याकडे आला आणि म्हणाला भविष्यात काय होणार आहे याची आपणाला माहित आहे.पुढील २२  वर्षात त्याने हजारोवेळा लैंगिक शोषण केले. तो स्वतःची तुलना भगवान श्रीकृष्णाशी करतो. आणखी एका पीडितेने सांगितले की, राजिंदर वयाच्या १३ व्या वर्षापासून तिचे शोषण करत आहे. २०१७ मध्ये त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली तेव्हा राजिंदरच्या काही शिष्यांनी मिळून त्यांना ॲसिड हल्ला करण्याची धमकी दिली.

पीडितांनी राजिंदरविरुद्ध ८४ कोटी रुपयांचा गुन्हा दाखल केला आहे. राजिंदरवर शिष्यांनी पोलिसांत तक्रार केल्यावर पावणे तीन लाखांची लाच दिल्याचाही आरोप आहे. पोलिसांनी हे आरोप फेटाळून खटला रद्द केला. राजिंदरने आपली बदनामी करण्यासाठी हा कट रचल्याचा आरोप केला आहे.वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest