खायचे वांदे पण संरक्षणावर वाढीव खर्च...
पाकिस्तानची आर्थिक दुरवस्था हा सध्या जगभरात चेष्टेचा विषय बनला आहे. मात्र इतक्या नाजूक आर्थिक परिस्थितीतही पाकिस्तानने संरक्षणासाठीच्या निधीत १६ टक्क्यांची वाढीव तरतूद केली आहे. सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या २ टक्के खर्च संरक्षणावर करत असल्याचा दावा पाकिस्तान सरकारने केला आहे.