'H3N8' in China : चीनमध्ये ‘एच३एन८’ चा पहिला बळी

कोरोनानंतर आता चीनमध्ये एका नव्या विषाणूने दहशत निर्माण केली आहे. इथे 'एच३एन८' नावाच्या बर्ड फ्लूच्या विषाणूमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दक्षिण चीनच्या झोंगशान शहरातील ५६ वर्षीय महिलेला 'एच३एन८' बर्ड फ्लूचा संसर्ग झाला. सोमवारी (१० एप्रिल) तिचा मृत्यू झाला. या विषाणूने माणसाचा बळी घेतल्याची ही पहिलीच घटना आहे. मागच्या वर्षी या विषाणूंचा संसर्ग झालेले दोन रुग्ण आढळले होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 12 Apr 2023
  • 02:37 am
चीनमध्ये ‘एच३एन८’ चा पहिला बळी

चीनमध्ये ‘एच३एन८’ चा पहिला बळी

गेली कोरोनाची लाट, आता बर्ड फ्लूची धास्ती

#बीजिंग

कोरोनानंतर आता चीनमध्ये एका नव्या विषाणूने दहशत निर्माण केली आहे. इथे 'एच३एन८'  नावाच्या बर्ड फ्लूच्या विषाणूमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दक्षिण चीनच्या झोंगशान शहरातील ५६ वर्षीय महिलेला  'एच३एन८'  बर्ड फ्लूचा संसर्ग झाला. सोमवारी (१० एप्रिल) तिचा मृत्यू झाला. या विषाणूने माणसाचा बळी घेतल्याची ही पहिलीच घटना आहे. मागच्या वर्षी या विषाणूंचा संसर्ग झालेले दोन रुग्ण आढळले होते.  

'एच३एन८' फ्लूचा विषाणू सामान्यतः पक्ष्यांमध्ये आढळतो. चीनमध्ये नोंदवलेले नवीन प्रकरण हे मानवांमध्ये संसर्गाचे तिसरे प्रकरण आहे, तर प्रौढ व्यक्तीला संसर्ग झाल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. या विषाणूमुळे पहिल्यांदाच एखाद्याचा मृत्यू झाला आहे. २०२२ मध्ये प्रथमच 'एच३एन८' विषाणूचा मानवांना संसर्ग होत असल्याचे सिद्ध झाले होते.  याला 'एशियाटिक फ्लू' किंवा 'रशियन फ्लू'  असेही संबोधले जाते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यानुसार,  'एच३एन८' एव्हीयन इन्फ्लूएंझामुळे झालेला हा पहिला मानवी मृत्यू आहे. गेल्या वर्षी मानवांमध्ये या संसर्गाची आणखी दोन प्रकरणे नोंदवली गेली. या संसर्गात दगावलेल्या महिलेला निमोनिया झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि नंतर तिचा मृत्यू झाला. तिला कर्करोगासह अनेक गंभीर आजार होते.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest