America : अमेरिकेत पुन्हा गोळीबार

अमेरिकेत पुन्हा एकदा अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे. टेक्सासमधील डॅलसजवळील एका शॉपिंग मॉलमध्ये रविवारी एका बंदूकधाऱ्याने शॉपिंग मॉलमध्ये घुसून अंदाधुंद गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे मॉलमध्ये गोंधळ निर्माण झाला. यामध्ये अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या व्यक्तीसह ९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८ जण जखमी झाले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 8 May 2023
  • 02:39 am
अमेरिकेत पुन्हा गोळीबार

अमेरिकेत पुन्हा गोळीबार

टेक्सास प्रांतातील अॅलन शहरातील शॉपिंग मॉलमध्ये झाला अंदाधुंद गोळीबार; ९ जण मृत्युमुखी, ८ जण जखमी

#टेक्सास

अमेरिकेत पुन्हा एकदा अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे. टेक्सासमधील डॅलसजवळील एका शॉपिंग मॉलमध्ये रविवारी एका बंदूकधाऱ्याने शॉपिंग मॉलमध्ये घुसून अंदाधुंद गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे मॉलमध्ये गोंधळ निर्माण झाला. यामध्ये अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या व्यक्तीसह ९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८ जण जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी संपूर्ण मॉलला वेढा दिला. पोलिसांनी हल्लेखोर ठार झाल्याचे सांगितले आहे. हल्लेखोर अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर स्वत:वर गोळी झाडून ठार झाला की पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरात त्याचा मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

टेक्सास येथे झालेल्या गोळीबारात अनेकजण जखमी झाले असून यात लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मॉलमध्ये झालेल्या गोळीबाराचा व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

रविवारी टेक्सास प्रांतातील डॅलसजवळील अॅलन शहरातील एका मॉलमध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी हल्लेखोराचा शोध सुरू केला. नंतर तेथे एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला, तो मृतदेह हल्लेखोराचा असल्याचे सांगितले जात आहे.

कॉलिन काऊंटीच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेत ९ जण मृत्युमुखी तर आठजण जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे. आमच्या मॉलमध्ये असा प्रकार घडल्याचा आम्हाला खेद वाटतो. आमच्या मॉलला भेट देण्यासाठी आलेल्या लोकांना हे सहन करावे लागले याबाबत आम्हाला दुःख झाल्याचे मॉल चालवणाऱ्या कंपनीने म्हटले आहे.

अमेरिकेसाठी बंदूक संस्कृती ही मोठी समस्या बनली आहे. २०२१ मध्ये जवळपास ४९ हजार लोकांनी गोळीबारात आपला जीव गमावला. त्यापैकी अर्ध्याहून अधिक लोकांनी आत्महत्या केली. देशात लोकसंख्येपेक्षा जास्त शस्त्रास्त्र आहेत. तीनपैकी एका प्रौढ व्यक्तीकडे किमान एक बंदूक असते आणि दोन पैकी जवळपास एक प्रौढ व्यक्ती बंदूक असलेल्या घरात राहतो.

गोळीबाराच्या घटना वाढल्या

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये अमेरिकत गोळीबारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. मागच्या काही वर्षांपासून अमेरिका आणि गोळीबार हे समीकरणच बनले आहे. गोळीबाराच्या या घटना हॉस्पिटल, पब, मेट्रो स्टेशन आणि इतर सार्वजनिक ठिकाणी घडल्या आहेत. अमेरिकेसाठी तेथील बंदूक संस्कृती ही दिवसागणिक मोठी समस्या होत चालली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दरम्यान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अलीकडेच  देशात शस्त्रास्त्रांबाबत कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले आहे. मात्र अद्याप याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest