इथला प्रत्येक दरवाजा हिरवा
#लंडन
प्रत्येक गावात काही प्रथा-परंपरा असतात, त्या गावचे लोक पिढ्या न पिढ्या या परंपरा जोपासत असतात. बाहेरच्या लोकांना या विचित्र वाटू शकतात, मात्र स्थानिकांसाठी या प्रथांचे पालन हा त्यांच्या सवयींचा भाग बनलेला असतो. इंग्लंडमध्येही एका गावात अशीच काहीशी विचित्र वाटणारी एक परंपरा पाळली जाते. इथल्या प्रत्येक दारावर हिरवळ दाटलेली असते. कारण या गावात प्रत्येक दार हिरव्या रंगाचे असायलाच हवे, असा नियम आहे. हा नियम इथे काटेकोरपणे पाळला जातो.
वेंटवर्थ नावाचे हे गाव इंग्लंडमध्ये नियमाचे काटेकोर पालन करणारे गाव म्हणूनच ओळखले जाते. कैक पिढयांपासून घराचे दरवाजे हिरव्या रंगाचे ठेवण्याची परंपरा चालत आलेली आहे. आजही परंपरा अबाधित आहे, कारण इथल्या गावचा तसा नियमच आहे. काहीही झाले तरी घराच्या दरवाज्यांचा रंग बदलायचा नाही, हा नियम या गावातल्या पुढच्या पिढीतल्या रहिवाशांनीही काटेकोरपणे पाळला आहे.
अंतर्गत रचना बदलण्यासाठी घ्यावी लागते परवानगी
गावकऱ्यांना त्यांच्या घराच्या आत काही बदल करायचे असतील तर आधी या संस्थेची परवानगी घ्यावी लागते. प्राचीन वारसा जोपासण्यासाठी हे गाव ओळखले जाते. प्रत्येक घराचा दरवाजा हिरव्या रंगाचा असायला हवा, असा इथला नियम आहे. जो सर्वांनाच पाळावा लागतो, अशी माहिती वेंटवर्थचे सरपंच अलेक्झांडर ग्रामोपॉल यांनी दिली आहे. तुम्ही गावच्या एखाद्या रस्त्यावरून जात असाल तर केवळ दरवाज्यांवरून हे गाव वारसा जपणारे गाव असल्याचे ओळखता येते, असेही ग्रामोपॉल अभिमानाने सांगतात.
वृत्तसंस्था