पाश्चिमात्य देशातही झुरळांच्या शेतीचा ट्रेंड
#ओट्टावा
मांसाहाराच्या कल्पना प्रांतानुसार बदलतात. चीनमध्ये साप, कीटक, झुरळ खातात हे जगजाहीर आहे. मात्र चीनमधील मांसाहाराची कल्पना पाश्चिमात्य देशांतही लोकप्रिय होत आहे, कॅनडा, स्वीडन या देशांतील लोकही आता झुरळांची शेती करायला लागले आहेत. मांसाहारात झुरळांचा समावेश झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी झुरळांची शेती करण्यास सुरुवात केली आहे.
जग फार मोठे आहे आणि इथे तुम्हाला अनेक विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला विविध प्रकारचे प्राणी, विविध शैलीचे लोक आणि त्यांच्या खाण्याच्या सवयी पाहायला मिळतात. प्रांताप्रांतानुसार खाण्याच्या सवयींमध्ये खूप बदल होतो. जगातील काही लोक शाकाहारी आहेत, तर काही लोक मांसाहारी. बऱ्याच जणांचे खाण्याचे पदार्थ असे असतात ज्यांची कल्पना करणे कठीण असते. साप, कीटक यांचे सेवन करणारे लोक देखील जगात आहेत. आता साप आणि कीटक त्यांचे खाद्यपदार्थ असतील तर त्यांचा पुरवठा असणे देखील आवश्यक आहे आणि त्यामुळेच अनेक ठिकाणी साप आणि कीटकांचीही शेती केली जाते. साप आणि झुरळांसह कीटकांची देखील शेती केली जाते, पण हे पोल्ट्री फार्मसारखेच आहे. मधासाठी मधमाश्या पाळल्या जातात, त्याच पद्धतीने कीटकांचीही शेती केली जाते. किडे पाहून काही लोक घाबरतात, तर काही ठिकाणी हेच किडे खाद्यपदार्थ म्हणून खाल्ले जातात. आपल्याला किडे दिसले तर आपण भीतीने त्यांना मारून टाकतो, पण काही देशांत त्यांना मारण्याऐवजी ते मोठ्या प्रमाणात पाळले जातात.
चीनमधील लोकांसाठी हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. जसे भारतात मत्स्य शेती केली जाते, मधमाशी पालन केले जाते, कोंबड्यांचे पोल्ट्री फार्म उभारले जातात, त्याचप्रमाणे चीनमध्ये मोठ्या प्रमाणात किडे-कीटक पाळले जातात. चीनमध्ये किड्यांची निर्मिती देखील केली जाते. हाच ट्रेंड आता पाश्चिमात्य देशांतही लोकप्रिय झाला आहे.