मेक्सिकोत आठ कामगारांची हत्या, पिशवीत मृतदेहांचे अवयव

मेक्सिको शहरात मंगळवारी (६ जून) आठ तरुण कामगारांचे मृतदेह सापडले आहेत. हे कामगार एका वादग्रस्त व्यावसायिकाच्या कॉल सेंटरमध्ये कार्यरत होते. संबंधित व्यावसायिक अमली पदार्थांचा मोठा व्यापारी आहे. चोरून अमली पदार्थांचा काळाबाजार करणाऱ्या या व्यावसायिकाने या कॉल सेंटरच्या माध्यमातून शहरातील युवकांना अमली पदार्थांच्या जाळ्यात अडकवण्याचा उद्योग सुरू केला. हे कामगार त्याच्या कॉल सेंटरमध्ये कामाला होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 9 Jun 2023
  • 08:48 am

मेक्सिकोत आठ कामगारांची हत्या, पिशवीत मृतदेहांचे अवयव

#मेक्सिको

मेक्सिको शहरात मंगळवारी (६ जून) आठ तरुण कामगारांचे मृतदेह सापडले आहेत. हे कामगार एका वादग्रस्त व्यावसायिकाच्या कॉल सेंटरमध्ये कार्यरत होते. संबंधित व्यावसायिक अमली पदार्थांचा मोठा व्यापारी आहे. चोरून अमली पदार्थांचा काळाबाजार करणाऱ्या या व्यावसायिकाने या कॉल सेंटरच्या माध्यमातून शहरातील युवकांना अमली पदार्थांच्या जाळ्यात अडकवण्याचा उद्योग सुरू केला. हे कामगार त्याच्या कॉल सेंटरमध्ये कामाला होते.

हे कॉल सेंटर विशेष करून अमेरिकी नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत होते. या कामगारांनी तेथील नोकरी सोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. अमेरिकन आणि मेक्सिकोच्या अधिकाऱ्यांनी या कामगारांची हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त केला आहे. ते काम करत असलेल्या कॉल सेंटरचे कार्यालय मेक्सिकोच्या पश्चिमेकडील ग्वाडालजारा शहराजवळ आहे. गेल्या महिन्यात हे कामगार कामावरून परत आल्यानंतर बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या नातलगांनी केली होती. त्यानुसार २० मे ते २२ मे दरम्यान एकूण सहा पुरुष आणि दोन महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात प्लास्टिक पिशव्यांत या तरुणांच्या मृतदेहांचे अवयव आढळल्याने संशय बळावला. शवविच्छेदन चाचण्यांत हे मृतदेह कॉल सेंटरच्या कामगारांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण नेमके किती कामगारांचे हे अवयव आहेत, याचा तपशील या तज्ज्ञांनी दिला नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest