डिलिव्हरी बॉयच्या बॅगेत आठशे वर्षांची गर्लफ्रेंड?
#लीमा
एका २६ वर्षीय तरूणाच्या ट्रॅव्हल बॅगेत मानवी हाडांचा सापळा सापडला आहे. हा प्रकार पेरू या देशात घडला आहे. पेरूतील २६ वर्षीय फूड डिलिव्हरी बॉयच्या बॅगमधून ८०० वर्षे जुनी 'ममी' सापडली आहे. इजप्तमधील ममी जगप्रसिद्ध आहेत. मात्र हा युवक त्याच्या बॅगमध्ये हा मानवी सांगाडा घेऊन फिरतो. हा सांगाडा पाहून पोलिसांनी चौकशी केली असता फूड डिलिव्हरी बॉयने दिलेल्या खुलाश्यामुळे पोलिसही चक्रावले आहे.
पेरु पोलिसांनी मंगळवारी (२८ फेब्रुवारी) २६ वर्षीय ज्युलिओ सीझर बर्मेजोला ताब्यात घेतले. तो म्हणाला की, ती माझी स्पिरिचुअल गर्लफ्रेंड आहे. सध्या पोलिसांनी सांगाडा ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. ज्युलिओ एका फूड डिलिव्हरी कंपनीत काम करतो. पोलिसांनी त्याच्या बॅगेतून सुमारे ६०० ते ८०० वर्षे जुनी ममी अर्थात मानवी सांगाडा जप्त केला आहे.ज्युलिओ लोकांच्या घरी अन्न पोहोचवतो. त्याच बॅगेत त्याने ममी ठेवली होती. पोलिसांच्या चौकशीत त्याने आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या. त्याच्या वडिलांनी ३० वर्षांपूर्वी कोणाकडून तरी ही ममी विकत घेऊन घरी आणल्याचा दावा केला आहे.
फूड डिलिव्हरी बॉयने त्या ममीचे नाव 'जुआनिता' ठेवले. याचा एक व्हीडीओही व्हायरल होत आहे. यामध्ये ज्युलिओ असे म्हणताना दिसत आहे की, जुआनिता माझ्या खोलीत माझ्यासोबत घरी राहते. ती माझ्यासोबत झोपते आणि मी तिची काळजी घेतो. ती माझी स्पिरिचुअल प्रेयसी आहे. पेरूच्या मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुनोच्या पूर्वेकडील प्रदेशातील ही ममी असावी. हा एका पुरूषाचा सांगाडा आहे. या मृत पुरुषाचे नाव वान जुआन आहे. तो व्यक्ती वयाच्या ४५ व्या वर्षी मृत्यूमुखी पडला असेल. तेव्हापासून ८०० वर्ष उलटून गेली आहेत. सरकारने त्या तरूणाकडून ही ममी जप्त केली असून त्यांनी तिला संग्रहालयात ठेवली आहे. वृत्तसंंस्था