‘विवाहबाह्य’ प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प दोषी
#वॉशिंग्टन
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पैसे देवाण-घेवाणीच्या गुन्हेगारी प्रकरणात दोषी ठरले आहेत. अशाप्रकारे दोषी ठरलेले ते अमेरिकेचे पहिले अध्यक्ष आहेत. शारीरिक संबंध उघड करू नये यासाठी पोर्नस्टार स्टॉर्मी डॅनियलला पैसे दिल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर ठेवला होता. आता यावर प्रतिक्रिया देताना डॅनियलने कथित व्यवहाराला दुजोरा दिला आहे.
ट्विटरवर डॅनियल म्हणते की, या प्रकरणी माझ्या चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबाबत मी त्यांची खूप आभारी आहे. ट्रम्प यांना दोषी ठरवणाऱ्या प्रकाराबद्दल आनंद व्यक्त करताना ती म्हणते की, माझी शँपेन वाया जावी असे मला वाटत नाही. मला हे आनंदाचे क्षण साजरे करावयाचे आहेत. या निकालामुळे मी मार्केटिंग करत असलेल्या उत्पादनांना मागणी वाढली आहे. तसेच स्वाक्षरीसाठी माझ्याकडे येणारा ओघही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
डॅनियलचे खरे नाव स्टीफेनी क्लिफोर्ड असे असून ती म्हणते की, आपण दाखवत असलेल्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल तुमचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझ्याकडे एवढ्या पोस्ट येऊन पडल्या आहेत की त्यांना प्रतिसाद देण्याचा विचारही माझ्या मनाला पोहचत नाही. त्यांच्या संख्येमुळे त्यांना कसे उत्तर द्यावयाचे हेच मला समजत नाही. तसेच माझी शॅम्पेन वाया जावी असे मला वाटत नाही. त्याचा मला पूर्ण उपभोग घ्यावयाचा आहे. मी मार्केटिंग करत असलेल्या उत्पदनांना तुमच्याकडून जी भरभरून मागणी येत आहे, ती तातडीने पूर्ण करणे अवघड आहे. तुमची मागणी तुमच्यापर्यंत पोहचण्यासाठी काही अवधी तुम्ही द्यावा.
मॅनहॅटन येथील ज्यूरींनी हा निकाल दिल्यादिल्या ट्रम्प यांनी तो नाकारला आहे. तातडीने काढलेल्या निवेदनात ते म्हणतात की, हा राजकीय छळवणुकीचा आणि निवडणुकीतील हस्तक्षेपाचा प्रकार आहे. माझ्या ‘माय अमेरिका ग्रेट अगेन’ या मोहिमेला अपशकुन करण्याचा हा राजकीय विरोधकांचा प्रयत्न आहे.
या निकालानंतर डॅनियलने तिचे वकील क्लार्क ब्रेवस्टर यांचे ट्विटद्वारे आभार मानले आहेत. ब्रेवस्टर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, कायद्यासमोर प्रत्येकजण समान आहे. डोनाल्ड ट्रम्प दोषी ठरल्याचा आनंद मानण्याची गरज नाही. ग्रॅण्ड ज्यूरींनी घेतलेले कठोर कष्ट आणि त्यांनी दाखवलेली सद्सद् विवेकबुद्धीचा हा विजय आहे. आता सत्य आणि
न्यायाचा विजय होईल. वृत्तसंस्थ