स्टॉर्मीच्या वादळाने डोनाल्ड आउट

सार्वजनिक आयुष्यात स्वैराचाराचे आरोप झालेल्यांत डोनाल्ड ट्रम्प हे काही एकमेव अमेरिकन राजकारणी नाहीत. यापूर्वी क्लिंटन यांच्यावर तसे आरोप झालेले आहेत. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर केवळ खासगी प्रेमप्रकरणाचेच आरोप नाहीत. आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत, आपल्या उद्योगसमूहाला नियमांचे उल्लंघन करून कौल दिल्याचा आरोप आहे, समर्थकांकरवी निवडणूक निकाल प्रभावित करण्याचा आरोप आहे. मात्र या सगळ्या आरोपांपेक्षा ट्रम्प यांचे राजकारण संपवण्यासाठी स्टॉर्मी डॅनियल्सचे वादळ कारणीभूत ठरणार असल्याची शक्यता आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 4 Apr 2023
  • 01:46 am
स्टॉर्मीच्या वादळाने डोनाल्ड आउट

स्टॉर्मीच्या वादळाने डोनाल्ड आउट

भ्रष्टाचाराच्या आरोपांनी नव्हे तर प्रेमप्रकरणानेच संपणार ट्रम्प यांची कारकीर्द

#वॉशिंग्टन

सार्वजनिक आयुष्यात स्वैराचाराचे आरोप झालेल्यांत डोनाल्ड ट्रम्प हे काही एकमेव अमेरिकन राजकारणी नाहीत. यापूर्वी क्लिंटन यांच्यावर तसे आरोप झालेले आहेत. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर केवळ खासगी प्रेमप्रकरणाचेच आरोप नाहीत. आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत, आपल्या उद्योगसमूहाला नियमांचे उल्लंघन करून कौल दिल्याचा आरोप आहे, समर्थकांकरवी निवडणूक निकाल प्रभावित करण्याचा आरोप आहे. मात्र या सगळ्या आरोपांपेक्षा ट्रम्प यांचे राजकारण संपवण्यासाठी स्टॉर्मी डॅनियल्सचे वादळ कारणीभूत ठरणार असल्याची शक्यता आहे.     

२०१६ च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. या प्रकरणी ते न्यायालयात समर्पण करणार असल्याची चर्चा आहे. मात्र या सगळ्यांत सध्या अमेरिकेसह जगभरात अॅडल्ट स्टार स्टॉर्मी डॅनियल्सच्या नावाची चर्चा रंगली आहे. स्टॉर्मी डॅनियल्स ही अॅडल्ट स्टार आहे. तिने तिच्या 'फुल डिस्क्लोजर'  पुस्तकात सगळे खुलासे केले आहेत. तिचे खरे नाव स्टेफनी ग्रेगरी कँलिफोर्ड असे आहे. स्टॉर्मी २००६ साली एका गोल्फ सामन्यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना भेटली होती. तिच्या या चरित्रग्रंथात तिने तिच्या आयुष्याची इतिकथा सांगितली आहे. मात्र ट्रम्प यांनी तिच्यासोबतचे संबंध लपवण्यासाठी तिला गुपचूप पैसे दिले. हे प्रकरण त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे.  दरम्यान एका पॉर्नस्टारला लाच दिल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतरही, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेतलेली नाही. मॅनहॅटन ग्रँड ज्युरीने दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर २४ तासांच्या आत ट्रम्प यांनी २०२४ च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ४० लाख डॉलरपेक्षा जास्त निधी उभारला.आहे.

ट्रम्प यांच्यासोबतचे संबंध सहमतीचे  

ट्रम्प यांनी तिच्यासोबतचे संबंध लपवण्यासाठी तिला १ लाख ३९ हजार डॉलर दिले. हे पैसे नियमबाह्य पद्धतीने देण्यात आले. या बदल्यात तिने ट्रम्प यांच्यासोबतचे संबंध जगापासून लपवायचे होते. दुर्दैवाने ही माहिती २०१८ ला उघड झाली. स्टॉर्मी डॅनियल्सने ट्रम्प यांच्यासोबतचा गोपनीयतेचा करार रद्द करण्याची मागणी केली. एका मुलाखतीत तिने ट्रम्प यांच्यासोबत आपले संबंध असल्याचे घोषित  केले. मात्र हे करताना तिने ट्रम्प यांच्यासोबतचे संबंध सहमतीचे असल्याचा खुलासा केला.  स्टॉर्मी डॅनियल्स  आणि ट्रम्प एकत्र आले त्यावेळी तिचे वय २७ वर्षे आणि ट्रम्प हे ६० वर्षांचे होते. ट्रम्प यांनी शारीरिक संबंधांसाठी आपल्यावर जबरदस्ती केली नव्हती. ट्रम्प यांच्यासोबत संबंध ठेवल्याचा फायदा मला व्यावसायिक वाढीसाठी होणार होता, त्यामुळेच मी त्यांच्यासोबत संबंध ठेवल्याचा दावाही तिने केला आहे. वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest