राष्ट्रीय झेंड्याचा अपमान केल्याने फ्रान्समधून इमामची थेट हकालपट्टी

पॅरिस: राष्ट्रीय झेंड्याचा अपमान केल्याबद्दल एका नागरिकाची थेट देशातून हकालपट्टी करण्यात आली आहे. फ्रान्सचे मंत्री गेराल्ड डर्मैनिन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

DirectexpulsionofimamsfromFrance

राष्ट्रीय झेंड्याचा अपमान केल्याने फ्रान्समधून इमामची थेट हकालपट्टी

एका कार्यक्रमामध्ये  इमाम असणाऱ्या महजोब महजौबी यांनी फ्रान्सच्या झेंड्याला राक्षसी झेंडा म्हटले होतं. याचा व्हीडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मंत्री गेराल्ड डर्मैनिन सोशल मीडियावर म्हणाले की, महजोब महजौबी यांना देशाबाहेर काढण्यासाठी आदेश जारी करण्यात आला आहे. एका नव्या कायद्यामुळे हे शक्य झालं आहे. अटक झाल्यानंतर १२ तासांमध्ये आरोपीला पकडण्यात आले आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारचा हेतू ठेवून आरोप करणाऱ्या सर्व नागरिकांना हा इशारा आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, महजौब महजोबी यांना ट्युनिशियाला परत पाठवण्यात आले आहे. त्यांच्या वकिलाने सांगितले की त्यांच्या हद्दपारीविरोधात याचिका दाखल केली जाणार आहे.

इमाम महजौबी  यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. झेंड्याचा अपमान करण्याचा माझा कसलाही हेतू नव्हता, असा दावाही त्याने केला आहे. महजौब हे मूळचे ट्यूनेशियाचे असून ३८ वर्षांपूर्वी ते फ्रान्समध्ये आले होते. ते फ्रान्सच्या दक्षिणेकडील एका छोट्या शहरात एका मशिदीचे इमाम म्हणून काम करतात. 

महजौब यांचा हा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. या  व्हीडीओमध्ये इमामने देशाच्या झेंड्याला राक्षसी झेंडा म्हणत असल्याचं ऐकायला मिळते. ते  व्हीडीओमध्ये असेही म्हणतात की, अल्लाहसाठी याची काहीही किंमत नाही. यानंतर इमामने दिलगिरी व्यक्त केली होती. त्यावेळी ते म्हणाले की मी काही गुन्हा केला असला तर दिलगिरी व्यक्त करतो. झेंड्याविषयी बोलताना आपले नियंत्रण राहिले नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest