चिंतन की चिंता वाढवणारी बैठक?
उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग ऊन यांनी त्यांच्या सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या मध्यवर्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांची एक आढावा बैठक घेतली. देशाच्या अर्थव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगितले गेले. मात्र प्रत्यक्षात बैठकीत संरक्षण धोरणाचाच आढावा घेण्यात आला. अमेरिका आणि दक्षिण कोरियन नौदलाच्या संयुक्त सरावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने काय पावले उचलावीत, यावर बैठकीत विचार करण्यात आला.