'या ,रहा आणि ५० लाख मिळवा'

एखाद्या निसर्गसुंदर ठिकाणी आपले एक टुमदार घर असावे, असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. पण त्यासाठी पैसाही तेवढ्या प्रमाणात मोजावा लागतो. त्यामुळे असे घर सर्वांनाच परवडत नाही. पण तुम्हाला अशाच सुंदर ठिकाणी वास्तव्य करण्यासाठी कुणी पैसे देत असेल तर कोणीही आनंदाने इथे वास्तव्य करेल. स्वित्झर्लंड सरकारने असा एक प्रस्ताव नागरिकांसाठी दिला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 16 Mar 2023
  • 08:14 am
'या ,रहा आणि ५० लाख मिळवा'

'या ,रहा आणि ५० लाख मिळवा'

स्वित्झर्लंड सरकारची ऑफर चर्चेत; वास्तव्य करा आणि ५० लाख रुपये मिळवा

#बर्न

एखाद्या निसर्गसुंदर ठिकाणी आपले एक टुमदार घर असावे, असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. पण त्यासाठी पैसाही तेवढ्या प्रमाणात मोजावा लागतो. त्यामुळे असे  घर सर्वांनाच परवडत नाही. पण तुम्हाला अशाच सुंदर ठिकाणी वास्तव्य करण्यासाठी कुणी पैसे देत असेल तर कोणीही आनंदाने इथे वास्तव्य करेल. स्वित्झर्लंड सरकारने असा एक प्रस्ताव नागरिकांसाठी दिला आहे.

स्वित्झर्लंडमधील असे  एक ठिकाण सध्या चर्चेत आले आहे. जिथे राहण्यासाठी चक्क सरकार तुम्हाला पैसे देत आहे. एक-दोन लाख नव्हे तर तब्बल ५० लाख रुपयांची ही ऑफर आहे. ४२६५ फूट उंचावर असलेले हे गाव. बर्फाळ डोंगरातील हे गाव खूपच सुंदर आहे. या गावात राहण्यासाठी सरकार तुम्हाला पैसे देत आहे.  गेल्या काही वर्षांपासून या गावातील लोक हे गाव सोडून जात आहे. इथे काही मोजकेच लोक राहत आहेत. या गावाची लोकसंख्या वाढवण्यासाठी सरकार २०१८ सालापासूनच लोकांना हे प्रलोभन दाखवत आहे. या गावात राहण्यासाठी सरकारकडून दली जाणारी रक्कम भारतीय चलनानुसार ४९ लाख ४४ हजारपेक्षाही जास्त भरते आहे. चार सदस्यांचे कुटुंब असेल तर प्रत्येक प्रौढ सदस्याला २३ लाख रुपये आणि लहान मुलांना ९ लाख रुपये दिले जाणार आहेत.

जर तुम्ही या गावात दहा वर्षे राहिलात तर घराची किंमत वाढेल पण त्याआधीच ही जागा सोडली तर हीच रक्कम तुम्हाला परत द्यावी लागेल. हे गाव आहे अल्बिनेन, जे स्वित्झर्लंडमध्ये आहे. हे गाव फ्रान्स आणि इटलीच्या सीमेशी संलग्न स्वित्झर्लंडच्या वलाईस प्रांतात आहे. या गावात राहण्याच्या ऑफर्ससह काही अटीही आहेत. फक्त ४५ वर्ष वयाखालील लोकांसाठीच हा प्रस्ताव आहे. अर्ज करणारा स्विस नागरिक हवा. ज्याला परमिट सी मिळालेले असावे. 

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest