भक्कम पगाराच्या नोकरीकडे चीनच्या युवकांनी फिरवली पाठ
#बीजिंग
बेरोजगारी वाढत आहे म्हणावे तर चीनमध्ये रोजगाराच्या संधी मिळत असूनही युवक नोकरीकडे पाठ फिरवत आहेत. मात्र यामागील कारणे वेगवेगळी आहेत. महिना ६० हजार रुपये आणि निवासव्यवस्था उपलब्ध असूनही युवक नोकरीसाठी अनिवार्य अटींमुळे या नोकरीकडे पाठ फिरवत असल्याचे समोर आले आहे.
चीनच्या दक्षिणेकडील शेनझेनमधील एका कंपनीने नोकरीसाठी अशी जाहिरात दिली आहे. ज्यामध्ये विचित्र अटी ठेवल्या आहेत आणि सोशल मीडियावर लोक त्या पोस्टवर प्रश्न विचारत आहेत. ही जाहिरात ८ जुलै रोजी प्रसिद्ध झाली आहे आणि ५० हजार युआन (सुमारे ६० हजार रुपये) मासिक पगारासह अन्य सुविधा देण्यात येणार आहेत. कर्मचार्यांसाठी राहण्याची मोफत सोय देखील दिली जाते. मात्र यासाठी उमेदवाराला काही अटी पूर्ण कराव्या लागतात. सोशल मीडियावर ही जाहिरात पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. कारण चीन हा एक असा देश आहे, जिथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक माणूस झुरळ, किडे असे अनेक प्रकारचे कीटक तसेच प्राणी खातात. ज्या देशांत प्राणी-कीटकांना खाद्य मानले जाते, अशा देशात नोकरीसाठी शाकाहारी उमेदवाराची मागणी केली जाणे आश्चर्यकारक ठरले आहे.
काय आहेत अटी ?
कंपनीची अट अशी आहे की, कंपनी केवळ अशा लोकांनाच नोकरीसाठी संधी देणार आहे, जे दयाळू असतील, चांगले वागणारे असतील, जे धूम्रपान तसेच मद्यपान करत नाहीत. उमेदवार संपूर्ण शाकाहारी असला पाहिजे. कंपनीच्या एचआर विभागाचे म्हणणे आहे की, मांसाहार करणे कंपनीच्या संस्कृतीत बसत नाही. कंपनीच्या कॅन्टीनमध्ये देखील मांस दिले जात नाही. जे या कंपनीत काम करतात, त्यांना हे सर्व नियम पाळावे लागतात.