चीन इराणचा बेभरवशाचा मित्र

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी सध्या चीन दौऱ्यावर आहेत. हा त्यांचा पहिलाच चीन दौरा आहे. चीनसोबत द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी आलेल्या रईसी यांनी चीनच्या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चीनने इराणमध्ये गुंतवणूक करण्याचा शब्द दिला होता, मात्र तो पाळला नसल्याची खंत रईसी यांनी व्यक्त केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 19 Feb 2023
  • 04:33 pm
चीन इराणचा बेभरवशाचा मित्र

चीन इराणचा बेभरवशाचा मित्र

इराणच्या राष्ट्रपतींनी सुनावले खडे बोल, जिनपिंग यांनी शब्द दिला पण पाळला नाही

#तेहरान

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी सध्या चीन दौऱ्यावर आहेत. हा त्यांचा पहिलाच चीन दौरा आहे. चीनसोबत द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी आलेल्या रईसी यांनी चीनच्या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चीनने इराणमध्ये गुंतवणूक करण्याचा शब्द दिला होता, मात्र तो पाळला नसल्याची खंत रईसी यांनी व्यक्त केली आहे.

इराणला अपेक्षा आहे, त्यानुसार चीन इराणला मदत करत नसल्यानेच आजवर हे दोन देश म्हणावे तेवढ्या प्रमाणात जवळ येऊ शकले नाहीत. चीनसोबतचे आपले संबंध औपचारिक स्तरावरच राहिले असल्याचे रईसी म्हणाले आहेत.  चीनने इराणसोबत आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात चीनने हा शब्द पाळला नाही. दुर्दैवाने चीन आणि इराण यांच्यात खऱ्या अर्थाने मैत्रीपूर्व संबंध प्रस्थापित होऊ शकले नाहीत. चीनने इराणसोबत आर्थिक मदत करण्याचा करार केला होता. ज्यानुसार इराणच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चीन इराणमध्ये ४०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार होता. या बदल्यात इराण चीनला कच्च्या तेलाचा पुरवठा करणार होता. चीनने हा शब्द पाळला नाही. त्यामुळे इराण-चीन परस्पर सहकार्य कागदावरच राहिले असल्याचे राष्ट्रपती रईसी यांनी सांगितले. विशेष म्हणजे रईसी चीन दौऱ्यावर आले असताना त्यांनी जाहीरपणे चीनबाबत असे खडे बोल सुनावले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest