इम्रान खान यांच्या अटकेची शक्यता
#लाहोर
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकारी संस्थांविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी इम्रान खान यांना अटक करण्यासाठी बलुचिस्तान पोलिसांचे एक पथक बघवारी लाहोरला रवाना झाले आहे.
अटक वॉरंट घेऊन पोलीस पथक जमान पार्कला जाणार आहे. दरम्यान, या पोलीस पथकाला इम्रान खान यांच्या समर्थकांचा सामना करावा लागू शकतो. स्थानिक प्रशासनाने लाहोर शहरात संचारबंदी लागू केली आहे. मात्र हजारोंच्या संख्येने इम्रान खान यांचे कार्यकर्ते त्यांच्या संरक्षणासाठी जमान पार्क परिसरात जमा झाले आहेत. स्थानिक पोलिसांनी या जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. वृत्तसंंस्था