मदत मागायला आले अन् छत्रीहरी हहसकावलर
#पॅरिस
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे सध्या पॅरिस दौऱ्यावर आहेत. येथे जागतिक वित्तपुरवठा कराराबाबत दोन दिवसीय शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात कर्ज वाटप करण्याची मुदत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या देशाला आर्थिक मदत मिळावी, यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून शाहबाज शरीफ या शिखर परिषदेला उपस्थित राहिले आहेत.
या परिषदेत शाहबाज शरीफ हे सौदीचे राजे सलमान बिन अब्दुल अझीझ, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यासारख्या जागतिक नेत्यांची भेट घेणार आहेत. हे सगळे घडणार असताना शाहबाज यांचा एक वेगळाच व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हीडीओमुळे पाकिस्तानच्या युवकांनीच त्यांना ट्रोल केले आहे.
काय आहे व्हीडीओत?
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे पॅरिस शिखर परिषदेसाठी पलाइस ब्रॉन्गनियार्ट येथे आल्याचे दिसत आहे. यावेळी मुसळधार पाऊस सुरू असताना शरीफ यांनी एका महिला कर्मचाऱ्याची छत्री हिसकावली आहे. या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला आहे. शरीफ जेव्हा परिषदेसाठी बैठकीच्या स्थळी पोहोचले. तेव्हा बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. या पावसात एक महिला कर्मचारी शरीफ यांना घेण्यासाठी छत्री घेऊन आली. तेव्हा शरीफ यांनी तिची छत्री हिसकावून घेतली आणि तिला पावसात भिजत यायला भाग पाडले. पाकिस्तानी सोशल मीडिया वापरकर्ते त्यांच्या पंतप्रधानांच्या या असभ्य वर्तनावर संतापले आहेत. पंतप्रधान शरीफ यांनी त्या महिलेला पावसात का सोडलं? अशा कार्टुनला कुणी पाकिस्तानचा पंतप्रधान बनवले?, हेच का शहाबाज यांचे स्त्रीदाक्षिण्य? अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत.