ट्रम्पविरोधी जाहिरात मोहिमेसाठी बायडेन यांचे ५० दशलक्ष डॉलर

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील गंभीर आरोपांवर प्रकाश टाकण्यासाठी नवीन जाहिरात मोहीम तयार करण्यात आली असून त्यावर जूनअखेपर्यंत ५० दशलक्ष डॉलर्स खर्च करणार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या निवडणूक प्रचार समितीकडून सांगण्यात आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Wed, 19 Jun 2024
  • 03:05 pm
world news

संग्रहित छायाचित्र

#वॉशिंग्टन
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील गंभीर आरोपांवर प्रकाश टाकण्यासाठी नवीन जाहिरात मोहीम तयार करण्यात आली असून त्यावर जूनअखेपर्यंत ५० दशलक्ष डॉलर्स खर्च करणार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या निवडणूक प्रचार समितीकडून सांगण्यात आले. प्रत्यक्ष निवडणुकीला अद्याप साडेचार महिन्यांहून अधिक काळ असताना या महागड्या जाहिरात मोहिमेबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. २७ जून रोजी अटलांटा येथे दोन्ही उमेदवारांची चर्चेची पहिली फेरी होणार असून त्यापूर्वी मतदारांना आपली निवड अधिक स्पष्ट करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे बायडेन यांच्या निवडणूक पथकाने सांगितले.

ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील दूरगामी धोरण प्रस्तावांवर प्रकाश टाकणे तसेच असंतुष्ट लोकशाहीवादी, स्वतंत्र मतदारांना प्रोत्साहित करणे, हा बायडेन यांच्या प्रचाराच्या रणनीतीचा मध्यवर्ती भाग असेल. ट्रम्प यांच्या दोषसिद्धीकडे मोठ्या प्रमाणात झुकणारी जाहिरात तयार करणे आणि ती मोठ्या जाहिरात खरेदीमध्ये समाविष्ट करण्याबरोबरच ट्रम्प यांच्यासमोर कायदेशीर समस्या निर्माण करून निवडणुकीचा मुद्दा बनवणे, हा जाहिरात मोहिमेचा उद्देश आहे.

नवीन जाहिरात मोहिमेमध्ये कृष्णवर्णीय आणि आशियाई अमेरिकी मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या माध्यमांसाठी एक दशलक्ष डॉलरहून अधिक रक्कम खर्च केली जाणार आहे. यामध्ये न्यूयॉर्कच्या ‘हश मनी’ प्रकरणातील ३४ गुन्ह्यांबद्दल ट्रम्प यांच्या दोषांवर प्रकाश टाकणाऱ्या जाहिरातीचाही समावेश असणार आहे.  ट्रम्प यांच्या गुन्हेगारी कृत्यांव्यतिरिक्त, ‘कॅरेक्टर मॅटर्स’ या शीर्षकाच्या जाहिरातीमध्ये माजी अध्यक्ष लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीसाठी जबाबदार असल्याचे आढळले आहे. ट्रम्प यांना इतर तीन गुन्हेगारी प्रकरणांमध्येही गंभीर आरोपांचा सामना करावा लागत आहे. त्यापैकी कोणत्याही प्रकरणाचा निवडणुकीपूर्वी खटला चालणार नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest