जाती आधारित भेदभाव हद्दपार
#वॉशिंग्टन
जातीवर आधारित भेदभाव हद्दपार करणारे सिऍटल हे अमेरिकेतील पहिले शहर बनले आहे. शहराच्या प्रतिनिधीगृहात तसा प्रस्ताव मांडण्यात आला असून एक विरुद्ध सहा अशा बहुमताने हा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. शहराच्या प्रतिनिधीगृहाच्या सदस्य आणि भारतीय वंशांच्या अमेरिकन क्षमा सावंत यांनी असा प्रस्ताव मांडण्यासाठी पुढाकार घेतला.
खरे पाहता अमेरिकेत जाती आधारित भेदभावाला स्थान नाही. मात्र आशियायी नागरिकांमध्ये फूट पाडण्यासाठी विशेषतः भारतीय वंशांच्या अमेरिकन नागरिकांमध्ये भेद निर्माण करण्यासाठी जाती आधारित भेदभावाचा वापर केला जातो. असा भेदभाव हद्दपार केला जावा, यासाठी यापूर्वी भारतीय वंशाच्या अमेरिकन खासदार प्रमिला जयपाल यांनी तशी मागणी केली होती. मात्र आता सावंत यांच्या पुढाकार सिऍटल शहराच्या प्रतिनिधीगृहात हा ठराव पारित करण्यात आला आहे. जयपाल यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.
अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशांच्या नागरिकांना जातीवरून दुजाभाव सहन करावा लागणे सर्वथा अयोग्यच आहे. यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहोत, सिऍटलमध्ये हा ठराव कायदेशीररीत्या पारित झाला आहे, आता सर्वत्र हे या नियमाचे पालन व्हायला हवे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे क्षमा सावंत यांनी सांगितले. वृत्तसंंस्था