Balochistan: पाकची आणखी एक फाळणी?

इस्लामाबाद: बांगलादेशच्या (Bangladesh) निर्मितीनंतर कमकुवत झालेल्या पाकिस्तानची आणखी फाळणी होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचा (Pakistan) आणखी एक तुकडा स्वतंत्र होण्यासाठी धडपडत आहे. हा संघर्ष आजवर दाबून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला

संग्रहित छायाचित्र

बलुचिस्तानचे लोक करतायेत वेगळ्या देशाची मागणी

इस्लामाबाद: बांगलादेशच्या (Bangladesh) निर्मितीनंतर कमकुवत झालेल्या पाकिस्तानची आणखी  फाळणी होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचा (Pakistan) आणखी एक तुकडा स्वतंत्र होण्यासाठी धडपडत आहे. हा संघर्ष आजवर दाबून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला यापुढे ते शक्य होणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांनी नुकतेच कबूल केले की, बलुचिस्तानचे लोक केवळ असंतुष्ट नाहीत तर ते वेगळ्या देशाची मागणी करत आहेत. पाकिस्तानात पहिल्यांदाच एखाद्या नेत्याने बलुच आकांक्षा दाबून टाकण्यापलीकडे पोहोचल्याचे मान्य केले आहे.

काकर यांनी मुलाखतीदरम्यान बलुचिस्तानमधील (Balochistan) लोकांना जबरदस्तीने बेपत्ता करण्याच्या मुद्द्यावरही चर्चा केली. बलुच लोकांच्या अपहरणाचा मुद्दा गंभीर आहे,  सरकारसमोरील हे आव्हान स्वीकारत त्यांनी बेपत्ता लोकांना शोधण्याची मोहीम गतिमान केली असल्याचे सांगितले आहे. अन्वर उल हक काकर म्हणाले की, बलुचिस्तानच्या लोकांना वेगळी ओळख हवी आहे, हेच समस्येचे मूळ आहे. यापूर्वी कोणत्याही पाकिस्तानी नेत्याने हे वास्तव जगजाहीर केलेले नाही.

काकर यांचे हे विधान मागील सरकारांपेक्षा वास्तवावर आधारलेले आहे. बलुचिस्तानच्या पश्तुन पट्ट्यातून आलेल्या काकर यांचा कार्यकाळ अल्प असला ट्री आव्हानांनी भरला आहे. निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, सरकारकडे पैसे नाहीत, जनता उपासमारी आणि महागाईने त्रस्त आहे, अशा काळात काळजीवाहू  पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण करणे सोपे नसल्याची जाणीव असल्याने काकर खरे बोल्ट आहेत.

काकर यांच्या प्रशासनावर बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांवर बळाचा वापर केल्याचा आणि राजकीय सूडबुद्धीचा आरोप करण्यात आला आहे. पत्रकार, लेखक आणि नागरी समाजाटी सामाचजक कार्यकर्ते आणि वकिलांनी बलुच लोकांच्या स्वातंत्र्यलढ्याला मान्यता दिली आहे.

पुन्हा चीनकडे पसरले हात

पाकिस्तानने नुकतेच आपला जवळचा मित्र चीनकडून एका वर्षासाठी २ अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत मागितली आहे. काकर यांनी एका पत्राद्वारे चीनकडे नव्याने कर्ज देण्याची विनंती केली आहे. काकर यांनी आपल्या पत्रात आर्थिक संकटाच्या काळात चीनने पाकिस्तानला केलेल्या आर्थिक मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. रोखीच्या संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानने चीनकडून एकूण ४ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे कर्ज मिळवले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest