पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना सोडणार नाही : पुतीन
देशाला संबोधित करत असताना पुतीन यांनी येवगेनी आणि वॅगनर गटाला थेट इशारा दिला आहे. हा सशस्त्र उठाव म्हणजे आपल्या आणि देशाच्या पाठीत खुपसलेला खंजीर आहे. त्यामुळे गद्दारांवर आपण कठोर कारवाई करणार आहोत. हा विश्वासघात आम्ही सहन करणार नाही, या देशद्रोह्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल, असे पुतीन त्यांच्या भाषणात म्हणाले. पुतीन यांनी या सशस्त्र उठावाला देशद्रोह म्हटले आहे. वॅगनरने जो आपल्या पाठीत खंजीर खुपसला आहे, त्याची शिक्षा त्यांना नक्कीच मिळेल. रशियाच्या रक्षणासाठी जे करता येईल, ते मी करेल. तसेच, रोस्तोव-ऑन-डॉन शहरातील परिस्थिती सांभाळण्यासाठी निर्णायक कारवाई करण्यात येईल. रशिया सध्या आपल्या भविष्यासाठी सगळ्यात कठीण लढाई लढत आहे. देशात भाऊ-भावाविरुद्ध उभा राहत आहे. यासाठी वॅगनर सेनेने केलेला विश्वासघात कारणीभूत असून, त्यांना आपण त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ, असेही पुतीन यावेळी म्हणाले.