दारूच्या नशेत बायकोच्या कवटीचा बनवला अ‍ॅशट्रे

मेक्सिकोमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या करून तिचा मेंदू ‘मेक्सिकन’ पदार्थात टाकून खाल्ला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने मृत महिलेच्या कवटीचा वापर ‘ॲशस्ट्रे’ (सिगारेटची राख साठवण्याचे लहान भांडे) म्हणून केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sun, 9 Jul 2023
  • 12:59 pm
दारूच्या नशेत बायकोच्या कवटीचा बनवला अ‍ॅशट्रे

दारूच्या नशेत बायकोच्या कवटीचा बनवला अ‍ॅशट्रे

बायकोची हत्या करून तुकडे ठेवले पिशवीत

#मेक्सिको

मेक्सिकोमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या करून तिचा मेंदू ‘मेक्सिकन’ पदार्थात टाकून खाल्ला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने मृत महिलेच्या कवटीचा वापर ‘ॲशस्ट्रे’ (सिगारेटची राख साठवण्याचे लहान भांडे) म्हणून केला आहे.

२९ जून रोजी ही धक्कादायक घटना घडली आहे. ३२ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या करून, चक्क तिचा मेंदू खाल्ला. नशेमध्ये असताना त्याने हा प्रकार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. अल्वारो असे या व्यक्तीचे  नाव आहे. २९ जून रोजी नशेत असताना त्याने आपल्या पत्नीची हत्या केली. सँता म्युएर्ते (मृत्यू देवता) आणि सैतानाने आपल्याला हे करण्याची सूचना दिली, असे या व्यक्तीने पोलिसांना सांगितले. हत्या केल्यानंतर या व्यक्तीने आपल्या बायकोचे तुकडे करून प्लास्टिक बॅगमध्ये ठेवले होते.

अवघ्या एका वर्षापूर्वीच अल्वारो आणि मारिया मॉन्टसेराट यांचे लग्न झाले होते. मारियाला आधीपासूनच पाच मुली होत्या. यातील सर्वात लहान १२ वर्षांची, तर सर्वात मोठी मुलगी २३ वर्षांची आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर तिच्या मेंदूचा काही भाग आपण टाकोजमध्ये (अमेरिकन पदार्थ) टाकून खाल्ल्याचे या व्यक्तीने सांगितले आहे. सोबतच, तिच्या कवटीचा वापर अ‍ॅशट्रे म्हणून केल्याचेही अल्वारोने मान्य केले आहे. हत्येनंतर दोन दिवसांनी या व्यक्तीने आपल्या एका सावत्र मुलीला फोन करून याबाबत माहिती दिली. तुम्ही येऊन तुमच्या आईला घेऊन जा, मी तिला मारून बॅगेत भरून ठेवले आहे, असा निरोप अल्वारोने फोनवर मुलींना दिला होता. मारियाची आई सेरन यांनी याबाबत माहिती दिली. त्याने कोयता, छन्नी-हातोड्याने माझ्या मुलीचे तुकडे केले. त्याने नक्कीच अमली पदार्थ घेतले असणार. त्याशिवाय असे कृत्य करणे शक्यच नसल्याचे सेरेन म्हणाल्या आहेत. अल्वारो आपल्या सावत्र मुलींना मारहाण देखील करत होता. पोलिसांना तपासावेळी अल्वारोच्या घरात जादूटोणा करण्याचे साहित्य देखील आढळल्याची माहिती समोर आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest