America's economic crisis : राज्यकर्त्यांच्या चुकांमुळेच अमेरिकेवर आर्थिक संकट

अमेरिकन अर्थव्यवस्था सध्या अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहे. एकीकडे २००८ नंतरच्या बँकिंग संकटामुळे मंदीचा धोका आहे, तर दुसरीकडे अमेरिकेच्या सरकारसमोर कर्जाचे हप्ते कसे फेडायचे असा प्रश्न आहे. राज्यकर्त्यांच्या चालढकल करण्याच्या वृत्तीमुळे आणि चुकीच्या धोरणामुळेच ही आफत ओढवली असल्याचे ख्यातनाम उद्योगपती वॉरन बफे यांनी नमूद केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 8 May 2023
  • 02:45 am
राज्यकर्त्यांच्या चुकांमुळेच अमेरिकेवर आर्थिक संकट

राज्यकर्त्यांच्या चुकांमुळेच अमेरिकेवर आर्थिक संकट

ख्यातनाम उद्योगपती वॉरन बफे यांची टीका; संकटावर मात करण्यासाठी धोरणात्मक निर्णयांची गरज

#न्यूयॉर्क

अमेरिकन अर्थव्यवस्था सध्या अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहे. एकीकडे २००८ नंतरच्या बँकिंग संकटामुळे मंदीचा धोका आहे, तर दुसरीकडे अमेरिकेच्या सरकारसमोर कर्जाचे हप्ते कसे फेडायचे असा प्रश्न आहे. राज्यकर्त्यांच्या चालढकल करण्याच्या वृत्तीमुळे आणि चुकीच्या धोरणामुळेच ही आफत ओढवली असल्याचे ख्यातनाम उद्योगपती  वॉरन बफे यांनी नमूद केले आहे.

वॉरन बफे सध्या त्यांच्या कंपनी बर्कशायर हॅथवेच्या गुंतवणूकदारांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी शनिवारी (६ मे) नेब्रास्का राज्यातील ओमाहा येथे आले होते. बफे यांनी प्रथमच आर्थिक मंदीच्या संकटाबाबत सविस्तर भाष्य केले आहे. आपण कधी स्वप्नातही अशा परिस्थितीची कल्पना केली नव्हती. कर्जाचे प्रमाण एवढे वाढेल, बँकिंग क्षेत्रात घडलेल्या घडामोडींना सरकारची कार्यपद्धती जबाबदार ठरली आहे. सरकारने बँकिंग क्षेत्र सावरण्यासाठी वेळीच रचनात्मक सुधारणा राबवल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती. अमेरिकेच्या मध्यवर्ती सरकारच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर एवढा वाढला आहे की, जूननंतर त्यांच्याकडे नित्याचा खर्च भागवायलाही पैसे नसतील.

ते म्हणाले की, सिलिकॉन व्हॅली बँक, सिग्नेचर बँक आणि फर्स्ट रिपब्लिक बँक ज्या प्रकारे राजकारणी, नियामक आणि प्रेस यांनी हे प्रकरण हाताळले ते पूर्णपणे चुकीचे होते आणि बँक ठेवीदारांना अवाजवी भीती दाखवली. अमेरिकेतील जनता भीतीच्या सावटाखाली आहे. बँकांमध्ये आपला पैसा सुरक्षित नाही, अशी भीती लोकांच्या मनात असेल, तर अशा स्थितीत आपण अर्थव्यवस्था चालवू शकत नाही. मात्र सरकारनेच ही भीती घालवायला हवी.  मात्र, हे सगळे घडत असूनही माझा अमेरिकेवरील विश्वास कमी झालेला नाही. या आजच्या बिकट अवस्थेतही मला अमेरिकेत जन्म घ्यायला आवडेल, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest