अमेिरकेलाही जड झाले कर्जाचे ओझे...
#वॉशिंग्टन
पाकिस्तान आणि श्रीलंकेसारखे विकसनशील देश कर्जबाजारी झाल्याचे आपण ऐकलेले आहे. मात्र अमेरिकेसारखा जगातील महासत्ता मानला जाणारा देशही कर्जाच्या ओझ्याखाली दबला असल्याचे आपण नव्याने ऐकत असू. ही माहिती खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी उत्सुक उमेदवार निक्की हेली यांनीच दिली असल्यामुळे ती खोटी असण्याची शक्यता नाही. अमेरिकेच्या डोक्यावरील कर्ज वाढवण्यासाठी आजवरील राष्ट्राध्यक्षांनी हातभार लावला असल्याचा आरोप हेली यांनी केला आहे.
पाकिस्तान आणि श्रीलंका हे देश कर्जबाजारी झाल्याचे जगजाहीर झाल्याने त्यांना नव्याने कर्ज द्यायला कोणी पुढे येत नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेनेही त्यांना नव्याने कर्ज देण्यासाठी भल्या मोठ्या अटी घातल्या आहेत. मात्र जगातील महासत्ता हे बिरुद मिरवणाऱ्या अमेरिकेला कर्जबाजारी व्हावे लागले आहे, ही गोष्ट विश्वसनीय वाटत नाही. आता ही बातमी प्रसारमाध्यमांनी अंदाजे दिली असती तर ते समजण्यासारखे होते. मात्र रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरलेल्या निक्की हेली यांनीच प्रचारमोहिमेदरम्यान ही माहिती दिली आहे. हेली यांच्या मते सध्या अमेरिकेच्या डोक्यावर ३१ हजार डॉलरचे कर्ज आहे.
निक्की हेली यांनी अमेरिकेच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे वाढवण्यासाठी जॉर्ज बुश आणि डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार ठरवले आहे.