Amul : ‘अमूल’च्या शिष्टमंडळातील सदस्यांवर विनयभंगाचा आरोप

न्यूझीलंडमधील एका शेतकरी महिलेने गुजरात सहकारी दूध महासंघाच्या (अमूल दूध) शिष्टमंडळातील दोन सदस्यांवर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात तिने तक्रार दाखल केली असून न्यूझीलंड पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 24 Apr 2023
  • 02:09 pm
‘अमूल’च्या शिष्टमंडळातील सदस्यांवर विनयभंगाचा आरोप

‘अमूल’च्या शिष्टमंडळातील सदस्यांवर विनयभंगाचा आरोप

न्यूझीलंडमध्ये महिलेचे शिष्टमंडळातील दोन सदस्यांवर गंभीर आरोप

#वेलिंग्टन

न्यूझीलंडमधील एका शेतकरी महिलेने गुजरात सहकारी दूध महासंघाच्या (अमूल दूध) शिष्टमंडळातील दोन सदस्यांवर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात तिने तक्रार दाखल केली असून न्यूझीलंड पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

गुजरात सहकारी दूध महासंघाचे शिष्टमंडळ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून त्यांनी १७ एप्रिल रोजी न्यूझीलंडमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला न्यूझीलंडचे कृषिमंत्री डॅमियन ओ’ कॉनर आणि कृषी उपसचिव जो लक्सटन हे दोघे उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान संबंधित शिष्टमंडळातील कर्मचाऱ्यांनी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून माझा विनयभंग केला. तसेच माझे फोटो काढले, असा आरोप या महिलेने केला आहे. 

या संदर्भात तिने तक्रार दाखल केली असून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, ही घटना आमच्यासमोर घडली असल्याचे न्यूझीलंडचे कृषिमंत्री डॅमियन ओ’ कॉनर आणि कृषी उपसचिव जो लक्सटन यांनी म्हटले आहे. गुजरात सहकारी दूध महासंघाच्या अधिकाऱ्यांनीही महिलेचे आरोप फेटाळले आहेत. संबंधित महिलेने केलेले आरोप चुकीचे असून अशी कोणतीही घटना घडली नसल्याची प्रतिक्रिया जीसीएमएमएफचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी दिली आहे. तसेच हे एक षडयंत्र असून काही लोकांकडून स्वत:च्या स्वार्थासाठी भारत आणि न्यूझीलंडमधील भागीदारीच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण केल्या जात आहेत, असेही ते म्हणाले.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest